छे,नरेंद्र दराडेंना उमेदवारीच नाही,शिवसेनेचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नाशिक  : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत सुरु असलेली सुंदोपसुंदी अद्यापही सुरुचं  आहे. हकालपट्टी करण्यात आलेले ऍड. शिवाजी सहाणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप खोडून काढतं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहिर झालीचं नसल्याचा गौप्यस्फोट केला.

गेल्या वर्षभरापासून तयारी करणारे नरेंद्र दराडे यांना देखील वेटींगवर ठेवले आहे. अद्याप कोणालही उमेदवारी जाहिर झाली नसल्याचे सांगत सहाणे यांनी आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देताना शिवसेनेला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. 

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारीसाठी दावेदार असलेल्या ऍड. शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सुपारी घेवून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला होता राऊत हे मराठा द्वेषी असल्याची उदाहरणे त्यांनी दिली होती. ऍड. सहाणे यांनी केलेल्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या राऊत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेवून आरोप फेटाळून लावण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यापार्श्‍वभूमीवर आज शिवसेना भवन मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. महानगप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, जगन आगळे, बाळासाहेब कोकणे यांनी संयुक्तपणे राऊत यांच्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चात सर्वपक्षिय सहभागी नेते सहभागी झाल्याचा दावा करताना सहाणे यांच्याकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप बडवे यांनी केला. महापालिका निवडणूकी दरम्यान सहाणें यांनी भाजपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरे महानगरप्रमुख सचिन मराठे यांनी सहाणे यांनी पक्षासाठी काय केले असा सवाल केला.

माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी पक्षात कोणाला काढायचे याचा अधिकार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाचं असल्याचे सांगितले. राऊत मराठाद्वेषी असल्याचा आरोप चुकीचा आहे. अद्याप कोणालाही उमेदवारी जाहिर झाली नसल्याचे सांगितले. 

Web Title: Marathi news shivsena politices