शिवशाहीच्या मद्यपी चालकाला 50 हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नाशिकः राज्य परिवहन महामंडळातर्फे 3 मार्च पर्यंत मद्यपी कर्मचारी शोध मोहिम राबविण्याचे जाहीर करुनही शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवितांना आढळुन आल्याने महामंडळाने 'शिवशाही' बसेस पुरविणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे. 

औंरंगाबाद - चंद्रपुर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालक बस नेत असल्याची तक्रार नाशिकच्या एका प्रवाशाने केली होती. त्यानंतर फिरोज हा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला होता. 23फेब्रुवारी पासुन महामंडळ त्याची चौकशी करत होते. तथ्य आढळल्यानंतर महामंडळाची प्रतीमा मलीन झाल्याने शिवशाही बससे पुरवीणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे. या घटनेनंतर सर्व विभाग नियंत्रकांना भाडेतत्वावरील शिवशाही बसवरील चालकांच्या गैरवर्तवणुकीवर लक्ष्य ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यातच महामंडळाने येत्या 3 मार्च पर्यंत विशेष मोहीम राबवुन मद्यपी चालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. 
 
Web Title: marathi news shivshhi driver penalty

टॅग्स