सिरीयावरील हल्ल्याचा मुस्लिमबांधवांकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

जुने नाशिक : रशियाकडून सिरीयावर गेल्या काही दिवसांपासून सतत हवाई हल्ले सुरु आहे. त्यात हजारों निरापराध मुस्लिम बांधव, चिमुकल्याना जीव गमवावा लागला. अशा हल्यांचा शहरातील मुस्लिम बांधवांकडून निषेध  करण्यात आला. 

जुने नाशिक : रशियाकडून सिरीयावर गेल्या काही दिवसांपासून सतत हवाई हल्ले सुरु आहे. त्यात हजारों निरापराध मुस्लिम बांधव, चिमुकल्याना जीव गमवावा लागला. अशा हल्यांचा शहरातील मुस्लिम बांधवांकडून निषेध  करण्यात आला. 
   शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात रजा अकॅमेडमीतर्फे शुक्रवारी (ता.2) विशेष नमाज नंतर बडी दर्गा मैदानवर "यौमे-ए-दुआँ' कार्यक्रम झाला. सिरीयातील हवाई हल्यांत मृत्युमुखी पडलेल्यांना शांती लाभो. तसेच तेथील अन्य बांधवाना ओडावलेली परिस्थीती सहन करण्याची शक्ती देवो.यासाठी शेकडो मुस्लिम बांधवानी शहर-ए-खतीब यांच्यासह विशेष प्रार्थना (दुआँ) केली. शहरात देशात शांती लाभो यासाठीही प्रार्थना केली.संयुक्त राष्ट्राने यामध्ये लक्ष घालून त्वरीत हवाई हल्ले थांबविण्यात यावी अशी मागणी केली. स्टॉप किलींग, प्रे फॉर सिरीया यासह तेथील परिस्थीती दर्शविणारे फलक हातात घेवून हल्यांचा विरोध करण्यात आला. तेथील हुकुमशाही पद्धतीस आळा बसवून त्याठिकाणी लोकशाही आणावी अशीही मागणी करण्यात आली. दहशतवादाची सुरुवात पाकिस्तानपासून झाल्याचे सांगत पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मीरमुक्तार अशरफी, एजाज काजी, वसीम पिरजादा, एजाज मकरानी, असलम खान आदी उपस्थीत होते. 

Web Title: marathi news sirya attack