"स्मार्ट रोड' खर्चावर मनसेचा आक्षेप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान सुरु झालेल्या स्मार्ट रोड ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हरकत घेतली आहे. मजबुत व सुंदर रस्ता असताना देखील खोदण्याची आवशक्‍यता का? असा सवाल करताना भुसंपादन न करता सतरा कोटी रुपयांचा खर्च दाखविलाचं कसा? असा सवाल मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी उपस्थित केला आहे. 

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान सुरु झालेल्या स्मार्ट रोड ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हरकत घेतली आहे. मजबुत व सुंदर रस्ता असताना देखील खोदण्याची आवशक्‍यता का? असा सवाल करताना भुसंपादन न करता सतरा कोटी रुपयांचा खर्च दाखविलाचं कसा? असा सवाल मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी उपस्थित केला आहे. 

   अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान 1.1 किलोमीटरचा स्मार्ट रस्ता विकसित करण्याचे काम सोमवार पासून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सतरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून स्मार्ट रस्ता सरासरी तीस मीटर रुंदीचा तयार केला जाणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी साडे सात मीटर जागा वाहनांसाठी, दोन्ही बहाजूला प्रत्येकी दीड मीटर जागा सायकल ट्रॅकसाठी होणार आहे.

  1.2 मीटरचे दुभाजक तयार केले जाणार असून रस्ता संपुर्णपणे कॉन्क्रीटचा आहे. पदपथावर बाकडे ठेवले जाणार आहे. रस्ता वांरवार खोदला जावू नये म्हणून टेलिफोन, विद्युत तारा व अन्य केबलसाठी डक्‍ट ठेवला जाणार आहे. रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, स्वंयचलित वाहतूक यंत्रणा, वाय-फाय आदी आधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहे.

दरम्यान रस्त्याच्या कामासाठी केला जाणाऱ्या खर्चावर मनसेने आक्षेप घेतला असून गटनेते शेख यांनी यापुर्वीचा रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा आहे. नुकतेच या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले असून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तरीही रस्ता खोदला जाणार असून त्यासाठी सतरा कोटी रुपयांची गुंतवणूक विश्‍वास बसणारी नसल्याचा आक्षेप घेतला आहे. रस्ता रुंदीकरण झाले असते तर सतरा कोटी रुपयांचा खर्च समजू शकतो परंतू रुंदीकरण न करता, त्यावर उड्डाणपुल अथवा भुयारी मार्ग न बांधताही एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्यावर शंका उपस्थित केली. 

तर गोदापार्कचे श्रेय घ्या 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळात सामाजिक दायित्वातून मोठे प्रकल्प उभारण्यात आले. स्मार्ट सिटी मध्ये तयार झालेले आयते प्रकल्प जसे, फाऊंटन वॉल, नेहरु उद्यानाचे सौंदर्यीकरण, उड्डाणपुलाखालील सौंदर्यीकरण, वाहतुक बेटांची निर्मिती, चिल्ड्रन ट्रॅफीक पार्क आदींचा समावेश करण्यात आला आहे. झालेल्या कामांचे श्रेय घेत असताना पुरात वाहून गेलेला गोदापार्क व गोदाघाटाचे पुर्ननिर्माण स्मार्ट सिटीतून का केले जात नाही असा सवाल देखील शेख यांनी उपस्थित केला. 
 

Web Title: marathi news smart road