सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानविरोधात  कोटपांतर्गत कारवायांचा श्रीगणेशा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक ः सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात खुलेआम सिगारेट फुंकणाऱ्यावर "सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम 2003 " ( कोटपा ) अंतर्गत गुरुवारी ( ता.22) नाशिक शहर पोलिसांनी पहिली कारवाई केली.

सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम 2003" ( कोटपा ) कायद्याची अंमलबजावणी हा डोकेदुखीचा व उदासिनतेचा विषय राहिला आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना संबंध हेल्थ फाऊंडेशनतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. 

गुरुवारपासून प्रत्यक्ष कारवाया सुरु झाल्या आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक टी. एस. राठोड, पोलीस नाईक संजय आहिरे, पोलीस हवालदार सागर हजारे, श्रीकांत महाजन आदीच्या पथकाने या परिसरातील के. टी. एच. एम. कॉलेज, पंडित कॉलनी, कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉलनी, तिबेटियन मार्केट. कॉलेज रोड आदी ठिकाणी ही कारवाया केल्या. शाळालगतच्या टपऱ्यांचा शोध घेत, त्यांना 200 रुपये दंडाच्या पावत्या फाडल्या.तसेच 
समज देण्यात आली. आज शुक्रवारी (ता.23) सातपूर परिसरात शाळा लगतच्या टपऱ्यांचा शोध घेत, त्यांना कोटपा कायद्याची माहीती देत, दंड वसूली व समज देण्यात 
आली. 
 
Web Title: marathi news smoking and tobbco problem