मांत्रिकाच्या वेळखाऊपणामुळे "त्या'मुलींचा मृत्यू, गुन्हा दाखल करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

नाशिक : सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय इलाज करण्याएैवजी आपल्या मंत्राच्या भरवश्‍यावर विष उतरविण्यात वेळ घालवुन दहेरवाडीच्या देवकी झुरडेच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली.तसेच यापुढे शिक्षण विभागाच्या मदतीने आदिवासी ग्रामीण भागात जनजागृती करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. 

नाशिक : सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय इलाज करण्याएैवजी आपल्या मंत्राच्या भरवश्‍यावर विष उतरविण्यात वेळ घालवुन दहेरवाडीच्या देवकी झुरडेच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली.तसेच यापुढे शिक्षण विभागाच्या मदतीने आदिवासी ग्रामीण भागात जनजागृती करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. 
दहेरावाडी येथील विद्यार्थीनी देवकी झुरडे हिचे शुक्रवारी सर्पदंशाने निधन झाले. हकनाक बळी गेल्याच्या वृत्तानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने त्या मांत्रीकावर कारवाई करण्याची मागणी केली. मांत्रिकानेही बराच वेळ मंत्रातंत्रात घालविला. त्यामुळेच देवकी उपचारा पासुन वंचित राहिली. या वेळखाऊपणामुळे तिच्या अंगात विष भिनल्याने त्यातच तिचे निधन झाले. अंधश्रध्दा निर्मुलन समीतीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, बुवाबाजी संघर्ष समीतीचे शहराध्यक्ष शशिकांत खडताळे, जिल्हा प्रधान सचिवव ऍड.समीर शिंदे,प्रल्हाद मिस्री आदींनी भद्रकाली पोलिस ठाण्यास निवेदन दिले. आदिवासी भागात अजुनही गंभीर आजार व घटनांवर दैवी अघोरी उपचार करुन घेण्याकडे या समाजाचा कल आहे. हे देवकीच्या मृत्युने ÷पुनहा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे भद्रकाली पोलिसांकडे विष उतरवण्याचा बहाणा करणाऱ्या त्या भोंदु मांत्रिकावरं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. ग्रामीण आदीवासी भागात अजुनही अंधश्र÷ध्दा कायम आहे. त्या दूर करण्यासाठी शालेय विद्यार्थी जीवनातच अंधश्रध्दा निर्मुलनाचे धडे दिले पाहिजे. सर्पदंशावर घाबरुन न जाता कसे वैद्यकीय रउपचार घेतले पाहिजे. मांत्रीकावर का अवलंबुन राहु नये. हे शिकविल्यास भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. त्यासाठी समिती सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटलेआहे. 

मंत्राने दैवी उपचाराने विष उतरविण्याचा थापा मारुन ग्रामीण आदिवासी भागातील नागरीकांचे शोषण करणाऱ्या त्या मांत्रिकावर भद्रकाली पोलिसांना कठोर करवाई केली पाहिजे. देवकी झुरडे हिला उपचारास पाठविण्याऐवजी मंत्राचा बहाणा करणाऱ्यावर जादुटोणाविरोधी कायद्याने गुन्हा दाखल करावा. यापुर्वीही त्याने असेच शोषण केले असण्याची दाट शक्‍यता आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आताच त्याची नांगी ठेचणे गरजेचे आहे. 
डॉ.ठकसेन गोराणे ( राज्य सरचिटणीस अं.नि.स. महाराष्ट्र)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Snake Bite