राजकीय भुकंपावर नेटकऱ्यांची विनोदी धम्माल...! 

residentional photo
residentional photo

नाशिक : सत्ता स्थापनेचा डावपेचात शनिवारी (ता.23) सकाळी झालेल्या राजकीय भुकंपामुळे अनेकांना खडबडून जागे केले. अगोदर विश्वास न बसणाऱ्या या बातमीची खात्री केल्यानंतर मात्र नेटकऱ्यांकडून राजकीय भुकंपावर विनोदी धम्माल करण्यात आली. दिवसभर मिम्स्‌, व्हिडीओ, संदेशांचा सोशल मिडीयावर धुमाकुळ राहिला. 

ऐरवी कुठल्याही घटनेचे सर्वात आधी पडसाद बघायला मिळतात ते सोशल मिडीयावर. पण शनिवार (ता.23) दिवस हा नेटकऱ्यांसाठी मनोरंजनाचा दिवस म्हटला तर वावगे ठरणार नाही. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विनोदांचा पाऊस सोशल मिडीयावर सुरू होता. "मी पुन्हा येईल' हा डायलॉग नेटकऱ्यांमध्ये चांगलाच चर्चेचा केंद्र ठरला तर "भाजपच्या पुस्तकाला राष्ट्रवादीचे कव्हर, घड्याळच आहे कमळाबाईचं लव्हर' या व अशा विविध विनोदी संदेशांचा पाऊस सुरू होता. 

सर्वांचे निखळ मनोरंजन

   सर्वाधिक मनोरंजन केले ते मिम्स्‌ आणि व्हॉट्‌ऍप स्टेटसने. मिम्स्‌साठी भाजपचे प्रमुख अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्भव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार व राजकीय नेत्यांची छायाचित्रे वापरण्यात येत होती. दुसरीकडे नेटकऱ्यांनी या राजकीय परीस्थितीबाबतचे आपले वैयक्‍तिक मत नोंदविल्याने व्हॉट्‌सऍप स्टेटस, फेसबुक पोस्टदेखील राजकीय रंगात रंगल्या होत्या. 

रजेसाठी शिक्षकाचे विनंतीपत्र व्हायरल 
चंद्रपूर येथील एका शिक्षकाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लिहिलेले विनंती पत्र चांगलेच व्हायरल झाले."आज महाराष्ट्राच्या राजनितीमध्ये आलेल्या भुकंपामुळे मी पार हललेला आहो. त्या मुळे या परीस्थितीतून सावरण्याकरीता मला एक दिवसाची सुट्टी हवी आहे.' असे नमुद करतांना सुट्टी मंजुर करण्याची विनंती या अर्जातून केलेली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com