मनपा इमारतीवर सौर उर्जा पॅनल,,,नव्या वर्षात वीज निर्मिती, एक कोटीची बचत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

नाशिक- पर्यावरण पुरक अशा सौर उर्जेच्या वापरासाठी स्मार्ट सिटी कंपनीतर्फे महापालिकेच्या बारा इमारतींवर सौर उर्जा पॅनल बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. नववर्षाच्या प्रारंभी या सर्व ईमारती सौर उर्जेने झळाळून निघणार आहेत. त्याबदल्यात महापालिकेचे वर्षाला एक कोटी रुपयांची वीज बचतं होणार आहे. 

अनोखा उपक्रम

नाशिक- पर्यावरण पुरक अशा सौर उर्जेच्या वापरासाठी स्मार्ट सिटी कंपनीतर्फे महापालिकेच्या बारा इमारतींवर सौर उर्जा पॅनल बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. नववर्षाच्या प्रारंभी या सर्व ईमारती सौर उर्जेने झळाळून निघणार आहेत. त्याबदल्यात महापालिकेचे वर्षाला एक कोटी रुपयांची वीज बचतं होणार आहे. 

अनोखा उपक्रम

वीज बचत व अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सौर उर्जा प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत एकुण एक मेगावॅट वीजेची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट आहे. महापालिकेच्या 15 इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प बसविला जात असून यातील बारा ईमारतींवर सोलर रुफ टॉप बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. सौरउर्जा वापराच्या माध्यमातून महापालिकेचे वीज बिलाचे एक कोटी रुपये वाचणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्वावर 25 वर्षांसाठी मे. वासंग सोलर वन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे प्रकल्प चालविला जाणार आहे. 

नक्की वाचा-मेथी जुडी कुणी फुकटही घ्यायना

अशी होईल विज निर्मिती (किलोवॅट मध्ये) 
- महापालिका मुख्यालय- 207.2. 
- सिडको विभागीय कार्यालय- 15.54. 
- जिजामाता प्रसृतीगृह- 13.2. 
- मायको हॉस्पिटल- 10. 56. 
- नाशिकरोड विभागीय कार्यालय- 52.8. 
- पंचवटी विभागीय कार्यालय (भाग-1) -25.16. 
- पंचवटी विभागीय कार्यालय (भाग-2)- 31.45. 
- पंचवटी अग्निशमन केंद्र- 26.4. 
- शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्र- 13.2. 
- महात्मा फुले कलादालन- 59.2. 
- दादासाहेब फाळके स्मारक- 66.33. 
- डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय- 100.64. 
- नवीन बिटको रुग्णालय- 100 (प्रस्तावित) 
- मुकणे वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट- 138 (प्रस्तावित) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news solar panel in nashik muncipal building