प्रवाशांचे मनोरंजन अन् सामाजिक बांधिलकी जपणारा अवलिया

आनंद बोरा
बुधवार, 2 मे 2018

 

 

नाशिकः रेल्वेने प्रवास करतांना बोगी मध्ये हमखास भेटणारा चेहरा म्हणजे टीसी...तिकीट चेक करणारा अधिकारी म्हणून त्याची दहशत आपण नेहमीच पाहतो. पण या सिरीयस चेहऱ्यांमागेही काहीतरी दडललंल असते. एखादा टीसी चक्क हिंदी गाणे गाऊन तुमचा प्रवास सुखद करत असेल तर....विश्वास बसत नाही ना...पण होय हे खरंय. सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये दिसणारे गणेश जोशी हे असेच आगळेवेगळे व्यक्तिमत्व. ते प्रवासाच्या तीन तासात 41हुन अधिक गाणे सादर करत प्रवाशांचे मनोरंजन करतात. एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आतापर्यत 20 हुन अधिक पोलिओच्या शस्त्रक्रीयेचा खर्च करत आपली वेगळी चूणूक दाखवली. या ध्येयवेड्या अवलिया विषयी... 

 या अवलियाला भेटायचे असेल किंवा  जुन्या काळातील गाणी ऐकायचे असेल तर तुम्हाला सेवाग्राम एक्स्प्रेस ने चंद्रपूर कडे प्रवास करावा लागेल. मुंबई येथून सुटणारी सेवाग्राम वर्धा येथे एक तासथांबते तेथे चंद्रपूरचे डबे दुसऱ्या ट्रेनला जोडले जातात  आणि मग ट्रेनचा प्रवास सुरु होतो...आणि लागलीच पांढऱ्या शुभ्र शर्ट आणि काळी पंत घातलेला कानात हेडफोन घातलेला एक अवलिया गणेश जोशी समोर दिसतात .

हसमुख चेहरा...प्रत्येक प्रवाश्याला मदत करणारा हा तिकीट चेकर गाणे गुंगुंतांना दिसतो मुळचा राजस्थान मधून आलेले सध्या हिंगणघाट येथे राहणारे  जोशी गेली दहा वर्ष टीसी चे काम करीत आहेत यात्रेकरूंच्या सुख आणि सुविधा पुरविण्यासाठी  आमची नेमणूक झाली असल्याचे सांगत जनतेची सेवा करण्याचा चांगला पलटफॉर्म मला मिळाला आहे तुम्ही गाणे गातात का...असा प्रश्न विचारल्यावर ते आपल्या शेजारी बसतात त्यांना मैत्री करून घेण्यास दोन मिनिटे देखील लागत नाही कोणते गाणे ऐकणार...तेच प्रश्न करतात ...आणि खिशातील मोबाईल काढून काही तरी सर्च करून जे गाणे ते गाणार आहे त्याचे संगीत शोधतात आणि मग पन्नाशीतील हे टीसी वजा गायक एकशे एक जुनी गाणे म्हणू लागतात त्यांचे गाणे ऐकून येथे गर्दी होऊ लागते

चल उड जारे पंछी...दो दिनका तिनका...अशी गाणी ते अगदी मनलावून गातात सकाळ ने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले कि मी तीन वर्षा पूर्वी गाणे गायला सुरवात केली एकदा तुला गाणे गाता येत नाही म्हणून माझा अपमान करण्यात आला होता पण जिद्द बाळगली तर तुम्ही सर्व काही करू शकतात मी देखील स्वतः कोणाची हि मदत न घेता गाणे शिकलो आज ते तब्बल २४ गायकांची गाणी गातात तीन तास रोज ते गाण्याचे सराव करतात. ते स्टेज शो देखील करतात तीन तासात सलग ते ४१ गाणी गातात आणि ते देखील कोणतेही मानधन न घेता...चढता सुरज हे त्यांचे आवडते गाणे आहे

सामाजिक जबाबदारीचे भान....

सामाजिक बांधिलकी जपत ते दरवर्षी नारायण सेवा मंडळ तर्फे आयोजित पोलिओ ऑपरेशन साठी २० ऑपरेशन साठी लागणारा एक लाखाचा खर्च दरवर्षी करतात संगीतातून प्रवाशांना उन्हाच्या त्रातून थंड करणारे असे अधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे

   आमची नेमणूक हि प्रवाश्यांच्या सेवेसाठी झालेली आहे त्यामुळे आमची भीती त्यांच्या मनातून काढणे आवश्यक आहे संगीत हा त्यातील मध्य मला वाटतो माझ्या कलेचा वापर मी या रेल्वेत करतो प्रवासी हक्काने बोलतात जवळ बसवितात संगीताने मन शुद्ध आणि प्रसन्न होते मी स्टेज शो देखील करतो पण एक रुपया देखील मानधन घेत नाही हजारो गाणी माझी पाठ झाली असून जुनी गाणी हा माझा आत्माच आहे.

- गणेश जोशी [ टीसी ]

Web Title: MARATHI NEWS SONG AND SOCIAL VIEW AVLIYA