सोनगडजवळ तिहेरी अपघातात 10 ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

गुजरातच्या हद्दीत सोनगडनजीक टॅंकर चुकीच्या दिशेने आल्याने कुशलगड-सुरत-उकई बसवर धडकला. या दरम्यान मागून भरधाव येणारी प्रवाशी क्रुझर बसलाही टॅंकरने जोरदार धडक दिली.

नवापूर: महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील सोनगड शहराजवळील पोखरण गावात गुजरात परिवहन विभागाची बस, क्रूझर आणि टॅंकरच्या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू तर प्रवाशी जखमी झाले. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर- सुरत महामार्गावरील गुजरातच्या हद्दीत सोनगडनजीक टॅंकर चुकीच्या दिशेने आल्याने कुशलगड-सुरत-उकई बसवर धडकला. या दरम्यान मागून भरधाव येणारी प्रवाशी क्रुझर बसलाही टॅंकरने जोरदार धडक दिली. गुजरात परिवहन विभागाच्या बस एका बाजूने अर्ध्यापर्यंत कापली गेली आहे. यात तिन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले आहेत. या अपघातात उमेश पवार हा गंभीर जखमी झालेला आहे. 

नक्की वाचा : गुंजाळीचा तरूणाने फुलविली पडीक जागेत परसबाग 
 

घटनास्थळी सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर उपचार दरम्यान तीन प्रवाशांना मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. अपघातामुळे नागपूर सुरत महामार्ग घटनास्थळी रक्तरंजित झाल्याचे दिसून आले अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढून रूग्णवाहिका बोलवीत जखमींना सोनगड सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

क्‍लिक कराः  सुळेंच्या भूमिकेमुळे "राष्ट्रवादी'चीच गोची! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songad accidant ten dethe