esakal | अहिराणी कार्टून क्लीपची सोशल मिडीयात धूम..!
sakal

बोलून बातमी शोधा

अहिराणी कार्टून क्लीपची सोशल मिडीयात धूम..!

अहिराणी कार्टून क्लीपची सोशल मिडीयात धूम..!

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : कार्टून चॅनलपासून (Cartoon Channel) मालिका व चित्रपटही तयार झाले. बालकांना कार्टून चॅनल पहाणे खूप आवडते. तासनतास ते टीव्हीसमोर (TV) न कंटाळता बसून राहतात. हाच धागा पकडून मोबाईलवर अहिराणी कार्टून क्लीप (Ahirani cartoon clip) खूप गाजत असून अबालवृध्दांमध्ये आवड निर्माण करीत आहेत. विनोदी ढंगाने केलेले संवादफेक, टिवटिवत बोलणे, चपखल अहिराणी जळगाव जिल्ह्यातील बोली आणि डोळे फिरवत कधी मिचकावत बोलणारे कार्टून पात्र यामुळे दोन ते तीन मिनिटाच्या अहिराणी क्लीप खूप व्हायरल होत असून खानदेशात (khandesh) आवडीने पाहिल्या जात आहेत,

(ahirani language cartoon clip goes viral on social media)

हेही वाचा: कौटुंबिक वाद..आणि मेहुण्याने शालकाला झोपेत संपवीले!

एखाद्या सामाजिक विषयावर विनोदी अंगाने रुचेल अशा काहीशा टीकात्मक स्वरुपाच्या कार्टून तयार केल्या जात आहेत. अर्थात त्या कार्टून क्लीप कोण, कुठे व कशा तयार करीत आहेत, त्याला आवाज कोण देत आहे व डबिंग कशी केली जात आहे हे समजून आले नाही. पण कार्टूनच्या तोंडची वर्तमान काळातील अस्सल खानदेशी अहिराणी व तिला कधी कधी हलक्या फुलक्या शिव्यांची फोडणीने रंगत आणली आहे.

हेही वाचा: शंभर रुपये द्या..पोलिस ठाण्यात युवकाचा धिंगाणा!

कोरोना काळात डाॅक्टर आणि पेशंटचे कार्टून क्लीप, आॅनलाईन शिक्षण, प्रेमी जोडप्यातील वाद, पोरगा बिघडना, नवीन सरपंच आणि मतदार, मोदी संगे मिटींग अशा कितीतरी क्लीप गाजत आहेत. देख बरं दरवाजा बंद करीसन हाणसू बापू. निवडना पयले काय सांगेत इसरीग्यात का? व येडी सुरत नी. शिलग रे तथा आता कथा तरफडी ऱ्हायना यासारखे वाक्य हसायला भाग पाडतात. आता तर या क्लीप यूट्युबवर पण मोठ्या प्रमाणात येत आहेत.

loading image