esakal | सोनगीर जामफळ धरणातून सोडले पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

songir jamfal dam

धरणात दहा लक्ष घनफुटाचे सहा मोठे खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे पाणी धरणाच्या बांधावरून जाऊ शकत नाही; परंतु प्रकल्प कामात वाढीव पाण्याचा अडथळा नको म्हणून हे पाणी सोडले जात आहे. 

सोनगीर जामफळ धरणातून सोडले पाणी 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून पावसाने मूळ धरण शंभर टक्के भरले असून स्त्रोत सुरूच असल्याने पाटचारीतून पाणी सोडण्यात आले आहे. मूळ धरणाची उंची २७ मीटर असून २५ मीटरपर्यंत पाणी पोहचले. दरम्यान धरणात दहा लक्ष घनफुटाचे सहा मोठे खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे पाणी धरणाच्या बांधावरून जाऊ शकत नाही; परंतु प्रकल्प कामात वाढीव पाण्याचा अडथळा नको म्हणून हे पाणी सोडले जात आहे. 

दोनशे गावे येतील सिंचनाखाली 
जामफळ धरणाचे काम वेगात सुरू असून तीन वर्षांत धरणाचे काम पूर्ण होईल. धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने शेती अधिग्रहणाअभावी धरणाचे पूर्वेकडील काम बंद आहे. तिकडे पाणी जाऊ नये म्हणूनही पाणी सोडण्यात आले. धरणाचे तीस टक्के काम पूर्णही झाले आहे. दरम्यान धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडले शिवारातील चैतन्यवन तसेच सोनगीर दोंडाईचा राज्य मार्गावर जाऊ नये म्हणून धरणाची उंची दोन मीटरने कमी करण्यात येत आहे. सुलवाडे- जामफळ -कनोली उपसा सिंचन ही अन्य योजनांपेक्षा वेगळी असून तिला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून मंजुरी मिळाली. चार वर्षांत योजना पूर्ण करणे बंधनकारक आहे. योजनेमुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रथम प्रत्येकी पन्नास व पुढे आणखी शंभर अशी दोनशे गावे सिंचनाखाली येतील. तापी नदीचे समुद्रात वाया जाणारे पाणी १२ फूट व्यासाच्या दोन जलवाहिनीतून जामफळ मध्ये टाकून तेथून परिसरातील पाच ते सहा व अन्य नऊ लहान मोठी धरणे भरली जातील. 

पाटचारीतून दहा सेंटिमीटर 
गतवर्षी चांगला पाऊस पडला त्यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. उन्हाळ्यात देखील ७० टक्के धरण भरले होते. यंदाही धरण परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरण भरले. त्यांपैकी दहा सेंटिमीटर उंचीइतके पाणी पाटचारीतून सोडण्यात येत आहे. ते पाणी लिमळी नदी पात्रातून सार्वे, पिंपरखेडा, गोराणे, नरडाणा पुढे तापी पर्यत जाईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. असे सांगण्यात आले. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image