सोनगीर जामफळ प्रकल्पाचे काम सुरू 

songir jamfal project
songir jamfal project

सोनगीर (धुळे) : तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम पाच आठवड्यानंतर पुन्हा सुरू झाले. मात्र कामाला हवी तशी गती नसल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागेल. ही परिस्थिती केवळ मुरूम, काळी मातीची कमतरता व शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. 
सध्या मूळ धरण ८५ टक्के भरले असून, कामात पाण्याचा अडथळा येत होता म्हणून पाटचारीतून पाणी सोडण्यात आले होते. धरणालगत बांध तयार करण्याचे काम पुन्हा सुरू झाले असून, पाटचारी काम सुरू आहे. यातच पाच-सहा शेतकऱ्यांनी जमिनीबाबत आक्षेप घेतल्याने तापी ते जामफळ धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी पाया तयार करण्याचे कामही खोळंबले आहे. 
कोरोनामुळे भीतीचे वातावरण असतानाही ऑगस्टपर्यंत काम सुरू होते. धरणग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला न मिळाल्याने शेती अधिग्रहणाअभावी धरणाचे उत्तरेकडील काम बंद पडले. काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला असला तरी, त्यांनी पेरणी केली असल्याने पिकांचे नुकसान करता येत नाही. धरणातूून पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून बांध बांधतांना काळी मातीचा उपयोग केला जातो. मात्र, शेतातून काळी माती काढता येत नाही. परिणामी, मुरूमही मिळत नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची प्रकिया कोरोनामुळे मध्येच बंद पडली आणि परिणामी काम खोळंबले. 
 
चार वर्षांत योजना पूर्ण करणे बंधनकारक 
संबंधित कामासाठी ५८ लाख घनमीटर मुरूम आवश्यक असताना आतापर्यंत केवळ दहा लाख घनमीटर मुरूम मिळाला आहे. याशिवाय १५० लाख घनमीटर काळी मातीपैकी फक्त २२ लाख घमी उपलब्ध झाला आहे. प्रकल्पासाठी सुमारे ५५० हेक्टर शेती संपादित करावयाची असून, मूळ धरणाची ६० हेक्टर, तसेेच सोनगीर शिवारातील ४८ हेक्टर शेती संपादित झाली आहे. दरम्यान, काम सुरू झाले असले तरी अद्याप सुमारे ४५२ हेक्टर शेती संपादित करायची असून, शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा आहे. ते रखडल्यास काम पुन्हा थांबेल, अशी चिन्हे आहेत. हे संपूर्ण काम चार वर्षांत पूर्ण करायचे आहे. मात्र, कामाची गती बघता यास वेळ लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com