esakal | एक अधिकारी आणि तब्बल नऊ गावांचे कारभारी !
sakal

बोलून बातमी शोधा

एक अधिकारी आणि तब्बल नऊ गावांचे कारभारी !

एकूण ४० गावे आणि विस्तार अधिकारी १२ त्यापैकी काहींना एकच, तर काहीकडे चार, सहा, नऊ गावांचाकाकारभार आहे.

एक अधिकारी आणि तब्बल नऊ गावांचे कारभारी !

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर ः धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या ८३ गावांवर गेल्या २९ ऑगस्टपासून प्रशासक नेमणुकीची आदेश जाहीर झाले असून त्याजागी ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, आरोग्य विभागातील विस्तार अधिकारींची नियुक्ती झाली आहे. मात्र एका अधिकारींकडे अनेक गावे दिल्याने व स्वतःचा कारभार सांभाळून ग्रामपंचायत प्रशासकाची जबाबदारी सांभाळायची असल्याने अनेकांना गावाचा कारभाराकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. त्यामुळे गावातील विकासाचा वेग थंडावला असून ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येथील प्रशासक के. एन. वाघ यांचेकडे सोनगीरसह तब्बल नऊ गावांचा कारभार आहे. त्यामुळे नियुक्तीपासून केवळ तीन दिवस ते ही थोड्या वेळासाठी ते येथे आले आहेत. त्यांच्यासह प्रशासकांनी प्रत्येक गावांना किती वेळ दिला असेल हा प्रश्नच आहे. 

वाचा- घरपट्टी पाणीपट्टीच्या थकबाकीने धुळे तालुक्यातील साठ गावांचा विकास खुंटला 
 

धुळे तालुक्यात ४०, शिंदखेडा तालुक्यात २१ व साक्री तालुक्यात २२ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त आहेत. धुळे तालुक्यात विस्तार अधिकारी के. एन. वाघ यांचेकडे सोनगीर, खंडलाय, वडगाव, दापुरा, दापुरी, सरवड, मोरदड, खंडलाय खुर्द व बांबुर्ले आदी नऊ गावांचा कारभार आहे. टी. के. तिवारी यांचेकडे कापडणे, बिलाडी दोन गावे, बी. व्ही. पाटील यांचेकडे आमदड, वजीरखेडे, चिंचखेडे, तरवाडे, मोरदडतांडा, विंचूर आदी सहा गावे, आर. डी. मेहेंदळे यांच्याकडे उडाणे, आर. डी. नांद्रे यांचेकडे कुंडाणे, वेल्हाणे, आर. एस. दंड गव्हाळ यांचेकडे खेडे, सुट्रेपाडा, सांजोरी, एस. एस. पाटील यांचेकडे नवलाणे, गोंदूर, बी. ए. भामरे यांचेकडे बोरसुले, नवे कोठारे, वडजाई, निकुंभे, पी. झेड. रणदिवे यांचेकडे वणी (बुद्रुक), लळींग, दिवाणमळा, एस. ए. कोळी यांचेकडे बेल्हाणे, पी. के. पारधी यांचेकडे मोघण, एस. एस. भामरे यांच्याकडे अजंग व कासविहीर, एम. डी. सोनवणे यांच्याकडे रामी, शिरधाने, नेर व सायने आदी गावांचा कारभार आहे. 

तोडगा काढणे आवश्‍यक 
सोनगीर हे २५ हजार लोकवस्तीचे गाव असून अनेकांचे दररोज ग्रामपंचायतीकडे विविध काम असते. ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांना बऱ्याचदा ग्रामपंचायतींच्या कामाची फाईल प्रशासक वाघ यांचेकडे धुळ्याला न्यावी लागते, असे दिसून आले आहे. एकूण ४० गावे आणि विस्तार अधिकारी १२ त्यापैकी काहींना एकच, तर काहीकडे चार, सहा, नऊ गावांचाकाकारभार आहे. कोरोना कधी जाईल हे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकाही अनिश्चित आहेत. तोपर्यंत गावाचा कारभार रखडत चालेल हे स्पष्ट असल्याने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


 

loading image
go to top