सकाळी सातलाच आयुक्तांनीच जाणून घेतल्या समस्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नाशिक ः राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवार (ता.28) नाशिक पुणे महामार्गावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहाला सरप्राईज भेट देउन समस्या जाणून घेतल्या.

नाशिक ः राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवार (ता.28) नाशिक पुणे महामार्गावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहाला सरप्राईज भेट देउन समस्या जाणून घेतल्या.

भल्या पहाटे थेट समाजकल्याण आयुक्तच वसतिगृहात अवतरल्याने यंत्रणेची मात्र चांगलीच त्रेधातिरपट उडाली. भल्या सकाळी सातलाच नाशिक पुणे महामार्गावरील सामाजिक न्याय भवनाशेजारील मुलींच्या शासकीय वसतिगृहात सकाळी सकाळी थेट राज्याचे समाजकल्याण आयुक्तच अवतरल्याने वस्तीगृहात आणि समाजकल्याण विभागातील यंत्रणेत एकच खळबळ उडाली. औपचारीक पाहणी न करता आयुक्तांनी मुलींच्या खोल्यातील स्थिती, स्वच्छता आणि अडचणी समजून घेत दुसऱ्या बाजूला मुलींच्या शैक्षणिकेत्तर उपक्रमांची माहीती घेतली.

  सहजसंवादातून झालेल्या या दौऱ्यात आयुक्तांनी स्वताच शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील आखो देखा हालच अनुभवला. प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी देविदास नांदगावकर, गृहप्रमुख श्रीमती सरिता रेड्डी,श्रीमती सविता गवारे, श्रीमती नंदा रायते व सुभाष फड आदी उपस्थित होते. 

श्री शंभरकर यांनी, विद्यार्थिनीशी बोलतांना, कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे ? क्‍लास लावला आहे का ? अभ्यासिका चांगली आहे का ? इंटरनेट सुविधा आहे का ? जेवण चांगले आहे का ? स्वच्छता चांगली आहे का ? परिसर कसा आहे? या आणि अशा प्रश्‍नांची सरबती करीत, मुलींसोबतच संवाद आस्थेवाईक चौकशीतून वाढवितांना आयुक्तांनी समाजकल्याण वस्तीगृहातील समस्या समजावून घेतल्या.

 त्यांनी "मुलींना आपली नियमित आरोग्य तपासणी होते ? हिमोग्लोबीन तपासणी केव्हा झाली ? वसतिगृहाच्या वेळापत्रकात आरोग्य तपासणी समाविष्ट असते ? असे प्रश्न विचारून त्यांनी मुलींच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील आहार पुरेशा आहे 
का? आपणास नासत्यात दूध, अंडी, फळे नियमीत भेटतात का ? संगणकरूम मध्ये इंटरनेट सुविधा आहे का? अभ्यासिकेत पुस्तके आहेत का ? आपण स्पर्धा परीक्षा पुस्तके वापरता का ? असा प्रकारे संवाद साधत आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थिनींना परीक्षांचा शुभेच्छा दिल्या. 

स्वच्छतेच्या सूचना 
वस्तीगृहातील पाहणीनंतर श्री शंभरकर यांनी, मुलींच्या निवास रूम मधील स्वच्छते बाबत लक्ष घालण्याच्या गृह प्रमुखांना सुचना दिल्या 
 

Web Title: MARATHI NEWS STUDENT HOSTAL