पत्नीला कड्यावरून ढकलल्याने मृत्यू,पती ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

वणी :  सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आलेल्या पतीने पत्नीला सतीच्या कड्यावरून खोलदरीत ढकलून दिल्याने तिचा मृत्यु झाला. या घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीराजांना भाविकांच्या साथीने सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले.

वणी :  सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आलेल्या पतीने पत्नीला सतीच्या कड्यावरून खोलदरीत ढकलून दिल्याने तिचा मृत्यु झाला. या घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीराजांना भाविकांच्या साथीने सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले.
    मध्यप्रदेश येथून आलेल्या नवविवाहित दांपत्य दर्शनासाठी आले होते. काल(ता.१४) रात्री एका रूमवर थांबले. दुसऱ्या दिवशी देवीचे दर्शन घेतले. पर्यटक म्हणून गडावर ठिकठिकाणी फेरफटका मारला. पेढे, बांगड्या, अशा अनेक वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर सप्तशृंगगड परिसरातील शिवालय तलाव बघण्यासाठी हे दांपत्य गेले. तिथे त्यांनी छायाचित्रकाराकडून फोटो काढले. त्यानंतर जवळच सतीच्या कडा पाहण्यासाठी गेले असता पतीने या कड्यावरून पत्नीला खोलदरीत ढकलून दिले. खोलदरीत ढकल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला ,  

या भागात उपस्थित असलेल्या भाविकांनी बघितल्यावर आरडाओरडा केली. मात्र आरोपी पळ काढण्याच्या प्रयत्नात असतांना ट्रस्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समयसुचकतेमूळे आरोपीस पकडण्यात यश आले. मयत महिलेचे नाव संगीता काळे व आरोपी पती यांचे नाव बाबूलाल काळे आहे. दांपत्य मूळचे मुरादपूर जिल्हा गुन्हा,(मध्यप्रदेश )येथील आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस कर्मचारी सचिन राऊत, योगेश गवळी करीत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sucide case