सुला फेस्ट 1 व 2 फेब्रुवारीला....हॉट चिप, सलीम-सुलेमानची  जोडीचे सादरीकरण

residentional photo
residentional photo

नाशिक : सुला विनियार्डसतर्फे आयोजित यंदाचा तेराव्या हंगामातील "सुलाफेस्ट 2020' संगीत महोत्सव येत्या 1 आणि 2 फेब्रुवारी होत आहे. नाशिक येथील सुला विनियार्डस्‌च्या प्रांगणात होत असलेल्या या महोत्सवात यंदा इंग्लडचे लोकप्रिय बॅंड "हॉट चिप' भारतातील आपले पहिले सादरीकरण करणार आहेत. तर बॉलीवूडमध्ये प्रचलित अशी सलीम-सुलेमानची जोडीदेखील संगीत महोत्सवाचे व्यासपीठ गाजविणार आहे. 

सुला विनियार्डसच्या यशस्वी वाटचालीचे वीसावे वर्षे साजरे करतांना यंदाचा महोत्सव आणखी भव्य आणि उत्तम स्वरूपात आयोजित केला आहे. गंगापूर धरण परिसरातील सुला विनियार्डसच्या प्रांगणात सुलाफेस्टच्या तयारीला वेग आला असून, यंदाचाही महोत्सव संगीत प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. दोन दिवसीय संगीत महोत्सवात दिग्गज कलावंताचे सादरीकरण होणार आहे. त्यातच ब्रिटिश चार्ट टॉपर "हॉट चिप' आपले भारतातील पाहिले सादरीकरण सुलाफेस्टच्या व्यासपीठावर करेल. तर "सलीम-सुलेमान' ही भारतातील लोकप्रिय जोडी या महोत्सवात बॉलिवूड तडका लावतील. 

धमाकेदार संगीत मेजवानी

धमाकेदार संगीतासोबत वाईनविषयी जाणून घेण्याची संधी उपलब्ध असेल. सोबत थकवा घालवत काही क्षण "विनो स्पा' येथे घालवण्याची संधी उपलब्ध असेल. सकाळी योगाचे सत्र, सायकलिंग आनंद द्विगुणित करणारा अनुभव ठरेल. खवय्यांची भूक भागविण्यासाठी पिज्जा पासून तपस किंवा लंचेऑन येथे चविष्ट पदार्थांवर ताव मारता येईल. यानिमित्त नवनवीन मित्र बनवायचीही संधी असेल. बझार येथे दिलेल्या भेटीतून खरेदीचा आनंद अनुभवता येईल. 


या कलाकारांचे होईल सादरीकरण 
अत्यंत आकर्षक अशा सादरीकरणाच्या यादीत प्रसिद्ध डच-न्यूझीलंड ट्रायो, "माय बेबी' (ज्यूट वेन डिजडिजिकक, कॅटो वन डिजिक आणि डॅनियल दफ्रीझ, जॉनस्तोन) यांचेही अनोख्या शैलीतील सादरीकरण होणार आहे. 'द लोकल ट्रेन' (रामित मेहरा, रमण नेगी, साहिल सरीन आणि पराग ठाकूर) यांच्याकडून हिंदी गाण्याची जुगलबंदी सादर केली जाईल. 

तिकीट विक्रीसोबत करणार वृक्षारोपण 
सुला फेस्टसाठी प्रत्येक तिकीट विक्री इतक्‍या रोपट्यांची लागवड सुला विनियार्डसतर्फे केली जाणार आहे. या माध्यमातून देशातील सर्वात शाश्वत संगीत महोत्सव म्हणून नावलौकिक मिळविण्याचा उद्देश असेल. तयारी अंतिम टप्प्यात आलेली असल्याने आत्ताच सहभागी होण्याचे नियोजन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com