सदगव्हाणला उसाचा शेतात आढळले बिबट्याचे दोन बछडे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

दोन्ही बछडे तीन ते चार दिवसापूर्वी जन्मलेले असावेत. असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.दोन्ही बछडे त्याच शेतात वनविभागाच्या निगराणी खाली आहेत.

तळोदा ः सदगव्हान ( ता. निझर ,गुजरात ) शिवारातील एका शेतात आज सकाळी ऊस तोड मजुरांना बिबटचे दोन बछडे आढळून आलेत. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा सूचना दिल्यात. सध्या दोन्ही बछडे त्याच शेतात वनविभागाच्या निगराणी खाली आहेत. 

नक्की वाचा :"कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित 
 

तळोदा तालुक्यातील धानोरा गावापासून १ ते २ किलो मीटरवर सदगव्हान गावाचा शिवारातील शेतात आज सकाळी नऊला ऊसतोड मजूर गेले असता, त्यांना बिबटचे दोन बछडे दिसून आलेत. त्यामुळे मजुरांनी तत्काळ शेत मालक पुरुषोत्तम पाटील यांना कळविले. पाटील यांनी तत्काळ तळोदा वनविभागाला माहिती दिली.वनक्षेत्रपाल निलेश रोडे, राणीपुरचे वनपाल एन. पी. पाटील, वनरक्षक विरसिंग पावरा, लक्ष्मी पावरा, अमित पाडवी, राजा पावरा आदी तेथे आले.दोन्ही बछडे तीन ते चार दिवसापूर्वी जन्मलेले असावेत. असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.दोन्ही बछडे त्याच शेतात वनविभागाच्या निगराणी खाली आहेत. वनविभागाचे कर्मचारी परिस्तिथीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. रात्री बछड्यांना मादी किंवा नर घेऊन जाईल अशी वनविभागाला आशा आहे. 

आर्वजून पहा : सोने तेजाळले; उच्चांकी 44 हजारांचा दर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Sadgavan found two calf calves in sugarcane fields