esakal | दुचाकी अपघातात बापलेक अन मायलेकासह पाच जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

दुचाकी अपघातात बापलेक अन मायलेकासह पाच जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळोदा : आमलाड- बोरद रस्त्यावर तळवे गावाजवळ दोन भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत (Two-wheelers Accident) पाच जण ठार (Death) , तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना बुधवारी (ता.७) दुपारी ३.४५ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये बापलेकासह मायलेकाचा समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातात एकाच वेळी पाच जण ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून आमलाड- बोरद रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचा आरोप होत आहे. (taloda two-wheelers accident five death one injured)

हेही वाचा: हवेतून ऑक्सीजनची निर्मीती; आठवड्याभरात प्रकल्प सुरु होणार


बोरद येथील रहिवासी व हल्ली मुक्काम खानदेशी गल्ली, तळोदा येथील उमेश शांतिलाल चव्हाण हे त्यांची आई सुनंदा चव्हाण व पत्नी पूजा चव्हाण यांच्यासह बोरद येथील शेतातील पीकपाणी पाहण्यासाठी गेले होते. तर तुळाजा (ता. तळोदा) येथील मदन दिवाल्‍या नाईक, दारासिंग जांभोरे, अमित नाईक हे तळोदा येथे अमित या मुलाचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आले होते. दिवसभर आपापली कामे आटोपून चव्हाण कुटुंब तळोदा येथे, तर नाईक कुटुंब तुळाजा येथे जात होते. त्याचवेळी तळवे गावाजवळ दुपारी ३.४५ ला दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. धडक इतकी भयानक होती, की दारासिंग छगन जांभोरे (वय ५०), मदन नाईक (वय ४८), अमित नाईक (वय १०) हे तिघेही जागीच ठार झाले, तर उमेश चव्हाण (वय २९) यांचा दवाखान्यात नेताना वाटेतच तसेच त्यांच्या आई सुनंदा चव्हाण यांचा नंदुरबार येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

हेही वाचा: भरदिवसा यावलमध्ये थरार..डोक्याला बंदूक लावून सराफ दुकान लुटले

काटेरी झुडपांनी रस्ता व्यापला
पूजा चव्हाण ह्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान आमलाड- बोरद रस्त्यावर जागोजागी काटेरी झुडपांनी रस्ता व्यापला असून, अनेक ठिकाणी रस्ता दृष्टीस पडत नाही, तर भरधाव वेगाच्या मोहात नागरिकांचा बळी जात असल्याची चर्चा घटनास्थळी होती. पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या वेळी परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

loading image