अरे ले ले भाई मसालेदार चाय लेलो...असेही चहा शौकीन मालेगावकर!

live
live

सोयगाव :  मालेगाव शहर व परिसरात
चहा टपऱ्याची विक्रमी संख्या आहे. शहवासीयांचे चहा वर प्रेम अढळ असून त्यामुळे येथील चहा, दूध, साखर यातील उलाढाल मोठी आहे. शहरातील पश्चिम भागातील यंत्रमाग व्यवसाय असलेल्या भागात चहाच्या टपऱ्या व हॉटेल रात्रंदिवस सुरु असतात. दिवसाला एका दुकानामध्ये शंभर किलो पेक्षा अधिक साखर चहासाठी वापरली जाते. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनेक चहाची दुकान रांगेत लावलेली आढळतात. साखरेच्या तब्बल ७०० हून अधिक पोत्यांची रोज विक्री होते. त्यामुळे मालेगाव शहर ओळख चहाशौकीनांचे मालेगाव शहर म्हणून सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे तरुणांना देखील रोजगार मिळत आहे

मध्य भागात तर हॉटेल तसेच टपऱ्यांबाहेरच खुर्च्या टाकून नागरिक चहाचा आनंद घेतात. नवीन बसस्थानकाबाहेर तर नेहमी गर्दी असते. शहरातील मुख्य भागात 'कोको' चहाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकात्मता चौक भागात तर दिवसेंदिवस चहाच्या टपऱ्यांची संख्या वाढतच आहे. तसेच नवीन बस स्थानक ते दरेगाव पर्यंतच्या रस्त्यालगत बहुतांश ठिकाणी चहाची दुकान लागलेली दिसून येतात. शहरातील  पश्चिम भागातील सखावत हॉटेल, न्यु मिलन, हॉटेल मिनार, बजरंग टी स्टॉल आदींसह हॉटेलमध्ये सकाळी सहा वाजेपासून चहा शौकीनांची गर्दी होते.

    या हॉटेल मधील कोको देखील मोठ्या प्रमाणात प्रसिध्द आहेत. येथे दिवसभर चहा बनविण्याच्या भांड्याला विश्रांती नसते. एका चहाचा ग्लास पाच रुपये तर कोकोचा ग्लास दहा रुपयांना विक्री होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी चहाची मोठ्या संख्येने दुकाने व हॉटेल आहेत. चहाच्या दुकानांसमोर बसण्यासाठी टाकलेल्या लोखंडी खुर्च्या वर चहा पिण्यासाठी लूम कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून येते. शहरात यंत्रमाग व्यवसायाचा खडखडाट रात्रदिवस सुरूच असतो. त्यामुळे येथील लूम कामगारांचे दोघा सत्रात काम चालते. त्यामुळे रात्री काम करणारे लूम कामगार चहा पिण्यासाठी हॉटेल रात्रदिवस सुरु असतात. शहरातील चहाच्या दुकानांमध्ये चहा बनविण्यासाठी दिवसाला २५ पेक्षा अधिक लिटर दूध लागते. शहरामध्ये चहा व कोको शौकीन मोठ्या प्रमाणात आढळतात.
-------------
: मलईदार कोकोला सर्वाधिक पसंती

मलईदार कोकोला सर्वाधिक पसंती आहे
कोको मध्ये मलई टाकल्यानंतर त्याची लज्जत न्यारी असते. तसेच शहरातील बहुतांश हॉटेल कोको बनविण्यात प्रसिध्द आहेत. दिवसाला प्रत्येक चहावाले दोनशे ते तीनशे रुपये कमवतो. तर बाहेर गावाहून आलेले नागरिक कोको पिण्यासाठी चहाच्या टपरीवर आवर्जुन  थांबते. कारण मालेगावात मिळणारा कोको जळगावसह धुळे शहरात मिळत नाही.

शहरातील नवीन बस स्थानक, मौसम चौक, किदवाई रोड, रावळगाव नाका, कुसुंबा रोड,चाळीसगाव फाटा, सटाणा रोड, एकात्मता
चौक, जुना आग्रा रोड यासह शहरातील मध्य

शुक्रवारी ग्राहकांची गर्दी रोज चहा व कोको बनविण्यासाठी साधारणतः दिवसात एक पोती साखर लागते. तर तिसहून अधिक लिटर दुध खरेदी करावे लागते. मालेगावात मुस्लिम बांधवांची संख्या जास्त असल्यामुळे शुक्रवार हा मालेगाव आठवडे बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी सिनेमागृहांसह सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
 राजू हॉटेलवाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com