अनिकेत पाटील, भाउसाहेब कचरे, विलास पाटील यांचे अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नाशिक ः भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिकेत पाटील आणि शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे भाउसाहेब कचरे या उमेदवारांनी आज शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी
अर्ज दाखल केले. दोन्ही उमेदवारांचे मेळावे आणि शक्तीप्रदर्शनाने खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले. आज अनिकेत पाटील, भाउसाहेब पाटील, विलास पाटील अशा तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या पाचवर पोहचली आहे. 

   उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. आज दोन्ही प्रमुख उमेदवारांनी नाशिक रोडला मेळावे घेतले. टोप्या, गर्दी आणि शक्तीप्रदर्शनाच्या मिरवणूकांनी येउन उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसोबत अर्ज दाखल करीत, शक्तीप्रदर्शन केले. दोन्ही उमेदवारांचे मेळावे दत्तमंदीर भागातच असल्याने पोलिसांनी दोन्ही उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांना स्वतंत्र मार्ग करुन दिले. मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपच्या अनिकेत पाटील यांचा मेळावा दत्तमंदीर मार्गावरील उत्सव मंगल कार्यालयात होता. तर कचरे यांच्या समर्थकांचा मेळावा दत्तमंदीर भागातील पाटीदार भवन सभागृहात होता. तिसरा अर्ज विलास शांताराम पाटील यांनी दाखल केला. 

कचरे यांचा अर्ज 
तत्पूर्वी पाटीदार भवनापासून जेल रोड हून कोठरी कन्या शाळेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यत कचरे समर्थक शिक्षकांची प्रचार फेरी निघाली. मिरवणूकीने आलेल्या कचरे यांच्यासोबत टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह, शिक्षक नेते शिवाजी निरगुडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी.देशमुख, बाळासाहेब सुर्यवंशी, एस.के.सावंत सुरेश शेलार, माणिक बिडवई आदीसह पाचही जिल्ह्यातील टीडीएफचे पदाधिकारी सहभागी झाले होते
 
Web Title: marathi news teacher election