नाशिक शिक्षकमधून शिवसेना पुरस्कृत किशोर दराडेंची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नाशिक : विधानपरिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी 20 हजार मतांमध्ये साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली.
अंबड मधील मध्यवर्ती गुदामात सकाळी 7 पासून मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या 20 हजार मतांची मोजणी दुपारी 3 पर्यंत चालली. त्यात उमेदवार निहाय मिळालेली मते अशी : किशोर दराडे-7924, टीडीएफ चे संदीप बेडसे-3427, भाऊसाहेब कचरे- 2878, आप्पासाहेब शिंदे-1537, भाजप अनिकेत पाटील-1946, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे-418, शिक्षक परिषद चे सुनील पंडित-146. 

पहिल्या टप्यात 633 मते अवैध ठरली असून 26 नोटा नोंदविण्यात आला. आता 29 हजार मतांची मोजणी सुरू झाली आहे. सर्व मते मोजल्यावर वैध, अवैध आणि नोटा मते निश्चित होतील. मग वैध मते भागीले 2 अधिक 1 असा विजयाचा कोटा ठरेल. 29 हजार मतांमधून कोटा पूर्ण न झाल्यास पसंतीक्रम मोजला जाईल, त्याच्या 14 फेऱ्या होतील. त्यातही कोटा पूर्ण न झाल्यास 2 उमेदवार पैकी अधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित होईल

Web Title: marathi news teacher election nashik counting

टॅग्स