esakal | फिरायला आलेले औरंगाबादचे  तिघे दुगारवाडी धबधब्याजवळ बुडाले 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

फिरायला आलेले औरंगाबादचे  तिघे दुगारवाडी धबधब्याजवळ बुडाले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : औरंगाबाद येथील शिक्षण घेत असलेले चार मुले आणि दोन मुली त्र्यंबकेश्‍वरला दुगारवाडी धबधबा येथे फिरायला आले होते. त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी रात्री परत आले आहे उर्वरित तीन बेपत्ता आहेत त्यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडलेला आहे उर्वरित दोघांचा शोध घेणे सुरू आहे हे सर्व जण मूळ तेलंगणा येथील असून औरंगाबादला शिक्षण घेत आहे. 

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी

औरंगाबादला कृषी महाविद्यालयात शिकत असलेले गिरीधर आकाश (वय 20) व्यंकटेश्‍वर रेड्डी (वय 20), काव्या एल (वय 20, हैद्राबाद), अनुषा (वय 21) रघुवंशी (वय 21, तेलंगणा), कोटी रेड्डी (वय 20) सर्व जण तेलंगणा हे सोमवारी (ता.16) औरंगाबाद येथून नाशिकला फिरायला आले होते. काल मंगळवारी (ता.17) दुपारी साडे चारला हे सहा जण नाशिकहून त्र्यंबकेश्‍वरला दुगारवाडी येथील धबधबा पहायला गेले होते. त्यापैकी गिरीधर आकाश (वय 20) व्यंकटेश्‍वर रेड्डी (वय 20) काव्य एल (वय 20) यांनी धबधबा पाहू नका असे सांगितले व ते निघून आले. मात्र अनुषा (वय 21), रघुवंशी (वय 21), व कोटी रेड्डी हे मात्र धबधबा पहायला थांबले 

नक्की वाचा- आठवली की ती एँना...नामपूरची होणार सून

अनुषाचा मृतदेह बाहेर आला
दरम्यान आज सकाळी त्यातील अनुषा हिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे लक्षात आले. स्थानीक ग्रामस्थांनी याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात माहीती दिली आहे. इतर बेपत्ता असलेल्या दोघांचा तपास सुरु आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने हवी उपाययोजना

नाशिकमधील दुगारवाडी धबधबा हा सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे तो पाहण्यासाठी विकेडला राज्यातील पर्यटकांबरोबरच महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने येतात, पर्यटकांनी काळजी घ्यावी, याबाबत परिसरात जनजागृती करण्यात आली आहे तरीही हौशी पर्यटक हे सूचनांचे पालन न करता पाण्यात उतरतांना आणि आपल्या जीव धोक्यात टाकतात. 

loading image