पोलिस,ग्रामस्थ,सकाळ प्रतिनिधींच्या साथीने अखेर तिघी पालकांच्या स्वाधीन 

live
live

घोटी : चार वर्षांच्या तीन बालिका आई-वडिलांची नजर चुकवत थेट आठ किलोमीटर पायपीट करतात, रात्रीच्या वेळी घोटी टोलनाक्‍यावर आल्या पण  तेथून घरचा रस्ता माहित नसल्याने चुकल्या आणि. आता जायचं कुठे? हा त्यांच्यासमोरील प्रश्न. पोटात भुकेचा गोळा उठलेला. डोळ्यांत अश्रूंच्या धारा...अखेर या तीन बालिकांना घोटी पोलिस,ग्रामस्थ आणि सकाळच्या प्रतिनिधींची साथ मिळाली आणि भेदरलेल्या बालिका व पालक दोघांच्या जीवात जीव आला. सुटकेचा निश्वासः त्यांनी सोडला. 

    रविवारी (ता. 21) रात्रीचे साडेनऊ वाजलेले. घोटी पोलिस ठाण्याचा दूरध्वनी खणाणला. ठाणे अंमलदार संतोष दोंदे बोलतोय. "साहेब, तीन लहान बालिका घोटी टोलनाक्‍यावर मिळाल्या, असे त्यावर सांगण्यात आले.' ही माहिती मिळताच पोलिस हवालदार सुहास गोसावी, नितीन भालेराव टोलनाक्‍यावर पोचले. पावसाची रिपरिप सुरू होती. त्या बालिकांच्या पोटात अन्नाचा कण नाही. स्वतःचे नाव सोडून त्यांना काहीच सांगता येत नव्हते. घरचा रस्ताही माहिती नाही. भेदरलेल्या अवस्थेतील बालिका, नाक्‍यावरील साईश्रद्धा हॉटेलसमोर जमलेली गर्दी मुंबई-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत होती. त्यांना घेऊन पोलिस ठाणे गाठत सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्यासमोर हजर केले. त्यांना जेवण दिले. भूक शमल्यावर मुली बोलू लागल्या.

सकाळ प्रतिनिधीची मदत

शेनवड गाव सांगितले. दोन शेनवड, एक खुर्द व दुसरे बुद्रुक. नेमके कोणते शेनवड?, ते त्यांना सांगता येईना. पोलिसपाटलांना दूरध्वनी लावावा तर तोही बंद. पोलिसांनी "सकाळ'चे घोटी शहर प्रतिनिधी गोपाळ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही गावातील संपर्कातील नागरिकांना कळविले. आपसूकच पालकांचा शोध लागला. तिकडे शेनवड बुद्रुक हद्दीतील पारधवाडी येथील आदिवासी समाजातील पालकही जीवाच्या आकांताने त्यांचा शोध घेत होते. महिला चिंतेत होत्या.

मुलींची वाट पाहून त्यांचे डोळे पाणावले 
प्रमिला खडके (वय 4), आर्या खडके (3) व दीदी गांगड (वय 4) या आई-वडील मजुरीकरिता शेतात गेल्याने दुपारी तीनला घरातील आजोबांचे लक्ष चुकवत त्यांनी घोटीचा रस्ता धरला. थेट आठ किलोमीटर अंतर पायी चालत टोलनाका गाठल्यावर जावे कुणीकडे हे त्यांना कळेना. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकाने विचारपूस करीत पोलिसांशी संपर्क केल्याने मोठा अनर्थ टळला. या बालिकांना शेवटी आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसपाटील, सरपंचांसमोर सुपूर्द करण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, सहकार्य केल्याची भावना, दिवसभरातील तणाव क्षणात दूर झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com