धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या 

धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या 

धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या 

 
जळगाव : शहरातील अशाबाबानगर परिसरातील तरुणीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी रामानंदनगर पोलिसांना वेळीच कळविली. तसेच परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना दूरध्वनी करून घटनेबाबत माहिती दिली. परंतु, तीन तास उलटूनही पोलिस घटनास्थळी पोहोचलेच नाही. अखेर मुलीच्या शोधात निघालेले आई, वडील रेल्वेरुळावर आले. वडिलांनी पोलिसांना दूरध्वनीवरून विनंती केल्यावर पोलिस आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील कर्मचारी श्रीराम राजाराम चौधरी (रा. आशाबाबानगर) यांची मुलगी धनश्री पंकज वसाने (वय 30) आई-वडिलांकडे आशाबाबानगरातच वास्तव्याला होत्या. आज सकाळी सौ. चौधरी मुलाला शाळेतून आणायला घरातून बाहरे पडल्या. साडेबाराच्या सुमारास त्या घरी परतल्या. मात्र, घरात धनश्री आढळून न आल्याने त्यांनी शेजारी, गल्लीत चौकशी केली आणि नंतर श्रीराम चौधरी यांना दूरध्वनीवरून कळवले. अचानक मुलगी निघून गेल्याने वसाने यांनी घराकडे धाव घेतली. आई-वडील असे दोघेही मुलीचा शोध घेत असताना दुपारी तीनच्या सुमारास खंडेरावनगर ते आशाबाबानगर दरम्यान रेल्वेबोगद्याजवळ काहीतरी घटना घडल्याचे कळाल्याने दोघा पती-पत्नीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मुलीचा छिन्नविछिन्न मृतदेह बघताच दोघांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला. मृतदेहाची पोलिस येण्यापूर्वीच ओळख पटलेली होती. अचानक कोसळलेल्या प्रसंगाने भेदरलेले पालक मुलीला उचलण्यासाठी पोलिसांना एका मागून एक फोन करीत होते. अखेर पोलिस आले. पोलिसांच्या पाहणीनंतर रुग्णवाहिका मागवून साधारण सव्वापाचला मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पंचनाम्यानंतर शवविच्छेदन करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हद्दीच्या भ्रमात झाला उशीर 
ेरेल्वे खांबा क्रमांक 416/27-29 दरम्यान घटना दुपारी एकच्या सुमारास घडली, धावत्या रेल्वेसमोर तरुणीने झोकून दिल्याबाबत उपस्टेशन प्रबंधकांनी वेळेतच घटना कळवली. मात्र, घटनास्थळ जीआरपीच्या हद्दीत असल्याच्या भ्रमात रामानंदनगर पोलिस घटनास्थळावर पोचलेच नाहीत. ट्रॅकवर पडलेला मुलीचा मृतदेह उचलण्यासाठी आई-वडिलांची झालेली अवस्था आणि वडिलांची धावपळ मन हेलावणारी होती. 


...ती मानसिक आजारी 
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्रीच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर ती माहेरीच आई-वडिलांकडे होती. मानसिक विकार जडल्याने काही दिवसांपूर्वी ती घर सोडून निघून गेली होती. मात्र, परत आल्याने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यात आली. आजही सकाळी साडेअकरापासून ती रेल्वेरुळावर फिरत होती. परिसरातील काहींनी हटकून दिला दोन वेळेस रुळावरून हकलून लावले. मात्र, नंतर तिने, जे करायचे तेच केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com