नगरसेवकांकडे राबणारे पालिकेच्या मुळ सेवेत, मुंढेचा दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नाशिकः शहरात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत असल्याची ओरड करतं स्वच्छता कर्मचारी भरती करण्याचे वांरवार मागणी करणारे नगरसेवक व नगरसेवकांची वट दाखवून त्यांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नुतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. तातडीने मुळ पदावर कामावर या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम भरताचं अडिचशे हून अधिक कर्मचारी मुळ सेवेत रुजू झाले आहेत. 

पालिकेच्या आस्थापनेवर 1993 सफाई कर्मचाऱ्यांची पदे मंजुर आहेत. नियमानुसार दहा हजार लोकसंख्येमागे पंचवीस सफाई कर्मचायांची आवशक्‍यता आहे. सन 2011 च्या लोकसंख्येचा विचार करता शहरात तीन हजार सातशे सफाई कर्मचारी आवशक्‍य आहे. परंतू सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या आसपास पोहोचल्याने सुमारे पाच हजार कर्मचारी सफाईसाठी लागतात. सफाई कर्मचारी कमी असल्याने वांरवार सफाई कर्मचारी भरती करण्याची मागणी केली जात आहे. येत्या वीस तारखेला होणाऱ्या महासभेत सातशे पदे आऊटसोर्सिंगने भरण्याचा देखील प्रस्ताव सादर झाला आहे.
सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी होत असताना नगरसेवकांकडे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेख आतापर्यंत कोणी केला नाही. पालिकेचे 280 कर्मचारी ज्या कामाचा पगार घेतात ते काम न करताचं नगरसेवकांच्या घरी, कार्यालयात एवढेचं नव्हे तर त्यांच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून देखील काम करतात. पगार पालिकेचा परंतू काम मात्र नगरसेवकांचे होत असल्याने अशा कर्मचाऱ्यांना मुळसेवेत दाखल होण्याच्या सुचना देताना कारवाईचा ईशारा दिला आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या दमबाजीला घाबरंत नाशिकरोड विभागातील 54 कर्मचारी मुळ सेवेत दाखल देखील झाल्याने सफाई कर्मचायांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

सफाई कर्मचाऱ्यांचे ऑडीट 
पालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचारी वेगळा व प्रत्यक्षात काम करणारे कर्मचारी वेगळे अशा तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्त मुंढे यांनी अशा कर्मचाऱ्यांचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या घराजवळचं साफसफाई करून प्रभागात झाडू मारल्याच्या आवेशात फिरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी झाडलोट न केल्यास कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. 
 
Web Title: marathi news tukaram munde