अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो,पाचही दरवाजे तीन फुटाने उघडले

समाधान कडवे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

वैतरणानगर -मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण आज अखेर ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असुन  धरणामधुन ९२०० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अप्पर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असुन मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटनार आहे.

इतिहासामध्ये अप्पर वैतरणा धरण बांधल्यापासून प्रथमच धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याजवळ गेला होता. दरम्यान धरण गतवर्षी भरणार की नाही अशा चर्चा रंगु लागल्या होत्या. मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने आज अखेर धरण भरल्याने मुंबई करांसह धरण परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासुन संततधार सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे.
वैतरणा धरणाचे पाचही दरवाजे उघडुन विसर्ग सुरू झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने धरणामधुन विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो असे प्रशासनाने सांगितले आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news upper vaiterna