मला पुरणपोळी आवडते, आज पोळा आहे, 1999 च्या सभेची चांदवडकरांना आठवण 

सुभाष पुरकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वडनेरभैरव: अटलबिहारी वाजपेयी यांची 19 सप्टेंबर 1999 ला तत्कालीन आमदार जयचंद कासलीवाल यांच्या प्रचारसभेसाठी चांदवड तालुक्‍यातील मंगरूळ येथे भव्य सभा झाली होती. या सभेत अटलबिहारी वाजपेयींनी भाषणाची सुरवात "मला पुरणपोळी खूप आवडते, आज पोळा आहे,' अशा मराठी शब्दांनी करताच उपस्थित श्रोत्यांनी एकच दाद देत घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

वाजपेयीच्या निधनाने 1999 च्या त्या सभेची आठवण ताजी झाली. पोळा महिनाभरावर येऊन ठेपला असताना अटलबिहारी यांच्या निधनाचे वृत्त समजताच चांदवडमधील भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. चांदवडला मोठी प्रचारसभा झाली होती, त्या दिवशी पोळा होता. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. पुरणपोळी अशा मोजक्‍या मराठी शब्दाने भाषणाची सुरवात करून लोकांची मने जिंकली होती. त्यांच्या जाण्याने चांदवड मतदारसंघावर तीन पंचवार्षिक अधिराज्य केलेले तत्कालीन आमदार जयचंद कासलीवाल यांच्याही आठवणी जाग्या झाल्या. 
 
Web Title: marathi news vajpai sabha