शहरात आजपासून वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नाशिक ः शहराच्या विविध भागात उद्यापासून (ता. 1) वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञाला सुरूवात होणार आहे. शहरात सर्वात जुनी समजली जाणारी गोदाघाटावरील वसंत व्याख्यानमाला, नाशिकरोड येथे नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅंक व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे चालवण्यात येत असलेली वसंत व्याख्यानमालाही उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे महिनाभर नाशिककरांना विविध विषयांवरील व्याख्यानांच्या मेजवानीचा लाभ मिळणार आहे. 

यशवंत महाराज पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेला उद्या (ता. 1) सायंकाळी 7 वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या मुलाखतीने प्रारंभ होणार आहे. आनंद व मनीषा क्षेमकल्याणी ही मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर अतुल दाते, न्या. रवींद्र चव्हाण, डॉ. अनुराधा श्रीखंडे, गोकुळ घुगे, डॉ. अजित नवले, सुरेखा बोऱ्हाडे, जयंत नारळीकर, असीम सरोदे, श्रीमंत माने, अंजली तापडीया, कवी राजेंद्र उगले, अरूण इंगळे, लक्ष्मीकांत देशमुख यासारख्या मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. 31 मे रोजी प्रांजली बिरारी आणि सहकारी यांच्या वसंत स्वरमाला या सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाने व्याख्यानमालेची सांगता होईल. 

नाशिकरोड येथील वसंत व्याख्यानमाला 61 वर्षे जुनी आहे. यावर्षी ही व्याख्यानमाला 1 ते 10 मे दरम्यान होणार आहे. यामध्ये 1 तारखेला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. यावेळी सुरेखा गणोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर 2 मे रोजी निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी, बाबा भांड, डॉ. स्वागत तोडकर, न्या. शशिकांत सावळे, मंगेश पंचाक्षरी, संतोष खेडलेकर, गीता माळी यांचे व्याख्याने तसेच कार्यक्रम होतील. 10 मे रोजी पोपटराव पवार यांच्या ग्रामसमृद्धीवरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा समारोप होईल. 

Web Title: marathi news vasant vyaakhan mala