जळगाव जिल्हा 14.57; धुळे 16.99 टक्‍के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

जळगाव ः विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील सकाळी अकरा वाजेपर्यंत 14.57 टक्‍के इतके मतदान झाले आहे. सकाळी सुरू असलेला रिमझिम पाऊस थांबल्याने अनेक मतदार हे केंद्रावर येवून मतदानाचा हक्‍क बजाविताना दिसत आहेत. यात जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी देखील मतदानाचा अधिकार बजाविला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकरा मतदार संघातून शंभर उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. जिल्ह्यात याकरीता 6 हजार 666 केंद्रावर मतदान प्रक्रिया होत असून सकाळी 7 ला मतदानाला सुरवात झाली. सकाळी अकरापर्यंत जिल्ह्यातील अकरापैकी एका देखील मतदार संघात अनुचित प्रकार घडलेला नसून प्रक्रिया शांततेत सुरू आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची संख्या देखील कमी होती. मात्र पाऊस थांबल्याने सकाळी नऊनंतर मतदारांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात साडेचौदा टक्‍के मतदान झाले आहे. 

धुळ्यात टक्‍का वाढला 
धुळे जिल्ह्यात देखील मतदानाचा टक्‍का वाढता असून, धुळे जिल्ह्याती पाच मतदार संघात मिळून सकाळी अकरापर्यंत साधारण 17 टक्‍के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री 21.72, धुळे ग्रामीण 14.32, धुळे शहर 8.82, शिंदखेडा 20.39 आणि शिरपूर 24.05 टक्‍के मतदान झाले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात देखील 24. 50 टक्‍के इतके मतदान झाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha election voting