दोन्ही उमेदवारांचा विजयाचा विश्‍वास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस विरुध्द शिवसेना अशी सरळच लढत झाल्याने नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यत चूरस होती. दोन्ही बाजूने राजकिय उट्टे काढण्यासाठी सगळ्या क्‍लृप्त्यांचा वापर झालेल्या या निवडणूकीत दोन्ही उमेदवार ठाम असले तरी, संख्याबळाचा आकडा किती राहील याचा अंदाज मात्र दोन्ही उमेदवारांनी टाळला आहे. 

नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस विरुध्द शिवसेना अशी सरळच लढत झाल्याने नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यत चूरस होती. दोन्ही बाजूने राजकिय उट्टे काढण्यासाठी सगळ्या क्‍लृप्त्यांचा वापर झालेल्या या निवडणूकीत दोन्ही उमेदवार ठाम असले तरी, संख्याबळाचा आकडा किती राहील याचा अंदाज मात्र दोन्ही उमेदवारांनी टाळला आहे. 

पालघरच्या निवडणूकीतील बदला घेण्याच्या ईर्शेने रिंगणात उतरलेल्या भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली. पालकमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा आदेश  बजावला. त्यानंतर कट्टर विरोध असलेल्या कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस-मनसे आणि जनता दलाच्या आघाडीत भाजपने मताचे दान टाकले. पण आघाडीच्या कायम विरोधात कार्यरत राहिलेल्या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्याना मतदानापुरतेही आघाडीशी जुळवून घेण्यास सांगितले. पण येणाऱ्या अडचणीची अस्वस्थता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चेहेऱ्यावरील लपत नव्हती. केवळ पक्षादेशाची औपचारिकता म्हणून भाजपचे पदाधिकारी कॉग्रेस आघाडीच्या गोटात उभे होते. मतदान होताच  भाजपच्या कार्यकर्त्यानी काढता पाय घेतला. 

आघाडी धर्माचे दर्शन 
राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत आघाडीतील राजकिय पक्ष एरव्ही परस्परांच्या विरोधात लढतात. पण आज मात्र सगळ्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांना एकत्र हात जोडावे लागत होते. एका रांगेत सगळ्या राजकिय पक्षाची एकमेव शिवसेने विरोधातील मतासाठी आवाहान करण्यासाठीची औपचारिकता अस्वस्थता दर्शविणारी होती. कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी गटाने येउन मतदान केले. मनसे व जनता दलासह इतरांनी साधारण तशीच औपचारिकता पाळली. एकाच बसमधून एकत्र येउन मतदान करीत, आघाडी धर्म पाळल्याचे जणू 
दाखविण्याचाच सोहळा असेच आजचे चित्र होते. 

शिवसेना घामाघूम 
आवाज कुणाचा म्हणत, डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी आज एकाकी होते. सगळ्याच्या विरोधात अशा भूमिकेतील कार्यकर्त्याना मतदानासाठी हात जोडून आवाहन करतांना घुसमट दिसत होती. राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार ऍड शिवाजी सहाणे हे शिवसेनेतील काम केलेले सहकारी असल्याने त्यांच्या विरोधात काम करतांना मत मागतांनाची अडचण काहीच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसत नाही. केवळ उपचार म्हणून हजेरी लावल्यानंतर बहुतांश शिवसेनेच्या शहरातील नेत्यांनी नाशिकच्या केंद्रावरुन काढता पाय घेतला. तसेच एकाचवेळी 15 केंद्रावर सगळ्याच राजकिय पक्षांच्या विरोधात लढतांना संघटनात्मक सगळी ताकद खर्ची लागावी लागल्याने खऱ्या अर्थाने आज शिवसेना घामाघूम झाल्याचे चित्र होते. 

मतदारांनी कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस,मनसे,जनता दल आघाडीवर मतपेटीतून दाखविलेला विश्‍वास येत्या 24 मेस विजयाच्या रुपाने सर्वासमोर येईल. याची पूर्ण खात्री आहे. 
आघाडीतील नेते,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. हे प्रयत्न विजयाच्या रुपातून दिसतील. 
-ऍड शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी कॉग्रेस उमेदवार) 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार मला उमेदवारी मिळाली. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी अहोरात्र प्रयत्न करुन माझ्या विजयासाठी झोकून देत 
काम केले. त्यामुळे मला 100 टक्के विजयाची खात्री आहे. सर्वाच्या प्रयत्नांबद्दल मी आभारी आहे. 
-नरेंद्र दराडे (शिवसेना उमेदवार) 
 

Web Title: marathi news vidhanparishad election