केंद्रीय अन्न सुरक्षा नियंत्रण संस्थेच्या सदस्यपदी विलास शिंदे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

लखमापूर: मोहाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांची ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ ('एफ.एस.एस.ए.आय.') या संस्थेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे अन्नप्रक्रिया उद्योग, ग्राहक प्रतिनिधी, संशोधन संस्था, खाद्य प्रयोगशाला, कृषि या क्षेत्रातील प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. त्याच बरोबर सर्व राज्यातील अन्नसुरक्षा आयुक्त हे देखील या समितीचे सदस्य असतात.श्री. शिंदे यांची कृषी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vilas shinde