प्रशासकीय टोलवाटोलवीत विनायक खिंडचे विस्थापित पून्हा पठारवाडीवर 

प्रशासकीय टोलवाटोलवीत विनायक खिंडचे विस्थापित पून्हा पठारवाडीवर 

त्र्यंबकेश्‍वरः वन व महसूल विभागाच्या टोलवाटोलवीत न्याय मिळत नसल्याने विनायक खिंडीतील विस्थापित कुटुंब आज पून्हा पठार वाडीवरील जागेवर बसले. वन विभागाने काल गुरुवारी (ता.3) बंदोबस्तात अतिक्रमण काढले मात्र संबधिताचे पुर्नवसन न झाल्याने पून्हा ही कुटुंब आहे त्या जागेवर वसली. 

दरम्यान, वनविभागाने तहसिलदारांना पत्र देत, नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबाच्या पुर्नवसनाबाबत माहीती मागिविली आहे. पश्‍चिम वन विभागाचे उपसंरक्षक कार्यालयाने हे पत्र दिले आहे.

 तहसिल कार्यालयाकडून मात्र पावसाळ्याला नउ महिणे होउनही नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेल्या विनायक खिंडीतील ग्रामस्थांचे पुर्नवसन केलेले नाही. त्यामुळे तीव्र पाणी टंचाईमुळे अडचणीत आलेल्या या कुटुंबियांना वनविभागाच्या पठारवाडीत पून्हा संसार थाटून पुर्नवसनाशिवाय तेथून न हटण्याची भूमिका घेत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. 

9 महिण्यापासून टोलवाटोलवी 
त्र्यंबकेश्‍वरला ब्रम्हगिरी डोंगराच्या कपारीच्या आश्रयाने मेटघर किल्ला परिसरात विनायक खिंडीत 25 आदिवासी कुटुंब वर्षानुवर्षापासून राहतात. पावसाळ्यात ब्रम्हगिरीची दरड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याने महसूल यंत्रणेने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून या कुटुंबाना विनायक खिंडीतील या कुटुंबाना तेथून हलविले. सध्या त्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संबधित कुटुंबानी वनविभागाच्या पठारवाडी या भागात उघड्यावर बस्तान ठोकले आहे. मात्र त्याला वन विभागाने हरकत घेत, काल बंदोबस्तात संबधित कुटुंबाची अतिक्रमण काढली. त्यामुळे दुसऱ्यादा उघड्यावर आलेल्या या कुटुंबियांनी आज पून्हा पठारवाडी भागात बस्तान बसविले. 

मेटघर किल्ला ही पेसा ग्रामपंचायत असून वर्षानुवर्षापासून वनविभागाच्या जागेवर राहणाऱ्या या कुटुंबांचे वनहक्क कायद्यानुसार पुर्नवसन व्हावे ही संबधितांची मागणी आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संबधित रहिवाशांनी जिल्हा यंत्रणेला पत्र दिले आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तवर स्थलांतरीत कुटुंबाचे 9 महिण्यानंतरही पुर्नवसन झालेले नाही. महसूल यंत्रणेचे तहसिल कार्यालय कुटुंबाचे पुर्नवसन करीत नाही, आणि वनविभाग त्यांच्या जागेवर बसू देत नाही, अशा कात्रीत सापडेलल्या या कुटुंबांनी रस्त्यावर संसार थाटला आहे. त्यामुळे कडाक्‍याच्या थंडीत उघड्यावरील कुटुंबाच्या पुर्नवसनाचा विषय ऐरणीवर आला आहे. 


गेल्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुबांना स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाच्या पुर्नवसनाचा प्रशासकीय यंत्रणेला विसर पडला. महसूल आणि वन विभागाने लवकरात लवकर पुर्नवसन करुन हा विषय मार्गी लावावा. 
-ललिता शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या त्र्यंबकेश्‍वर) 

ब्रम्हगिरीच्या कपारीच्या आश्रयाने राहणारी ही कुटुंब पेसा ग्रामपंचायतीत येतात. केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे स्थलांतर झाले आहे. पेसा गावातील आदिवासीचा वनहक्क कायद्यानुसार हक्क दिला पाहिजे. 
-रमेश गायकवाड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com