व्यवसाय शिक्षकांच्याप्रश्नी आज सचिव गुप्ता यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिकःमहाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उद्या (ता. 4) कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत व्यवसाय शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. 
 

नाशिकःमहाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उद्या (ता. 4) कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत व्यवसाय शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. 
 

पंडित पलुस्कर सभागृहात महाराष्ट्र व्होकेशनल टिसर्च असोसिएशनच्या विभागीय मेळावा झाला. या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष जयंत भाभे  म्हणाले, व्यवसाय शिक्षकांपुढे आज अनेक प्रश्‍न उभे ठाकले आहेत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण यातून उद्योजकतेचे तसेच व्यवसायाचे धडे दिले जातात. मात्र या विद्यार्थ्यांना नोकऱ्या किंवा रोजगार उपलब्ध होतांना अडचणी निर्माण होतात. व्यवसाय शिक्षकांना अनेकदा दुसरे विषयही शिकवावे लागतात. त्यामुळे आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी व्यवसाय शिक्षकांनी संघटीतपणे लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे, 

यावेळी विभागीय अध्यक्ष ए. बी. शिंदे, विभागीय सचिव प्रशांत वेढणे, जिल्हाध्यक्ष गणेश टर्ले, सुनील मनीयार, ज्योत्स्ना पवार, श्री. भट आदी उपस्थित होते. 
   श्री. भाभे म्हणाले, की 1988-89 पासून हे अभ्यासक्रम सुरू आहेत. 2007 मध्ये अभ्यासक्रमात बदल झाला. पुढे अनेक जण दुसरे विषय शिकवायला लागले. यात शिक्षकांचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. शिक्षकांच्या समस्या सुटण्यासाठी संघटीतपणे काम करणे गरजेचे आहे. 

या मेळाव्यात व्होकेशनल विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न, एमबीबीएस पात्रताधारक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी मिळावी, सर्व शिक्षकांना निवडश्रेणी मिळावी, 27 नोव्हेंबर 2015 या शासन निर्णयातील जाचक अटी दूर कराव्यात, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, विद्यापीठ स्तरावर या अभ्यासक्रमांना पूरक अभ्यासक्रम सुरू करावेत या विषयावर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. मेळाव्यासाठी नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: MARATHI NEWS VOCATIONAL TEACHER