जिल्ह्यात ४५ लाख ४६ हजार मतदार सोमवारी बजावणार मतदानाचा हक्क

residentional photo
residentional photo

नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात येत्या सोमवारी (ता.21) मतदान होणार आहे. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 15 मतदार संघात 4579 मतदान केंद्रावर सोमवारी (ता.21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

 पावसाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील 7 लाख विद्यार्थ्यानी त्यांच्या पालकांना पत्र देउन मतदानासाठी आवाहान केले आहे. अशी माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

जिल्ह्यात 23 लाख 76 हजार 405 पुरुष, 21 लाख 68 हजार 209 महिला 27 इतर याप्रमाणे 45 लाख 44 हजार 641 मतदार आहेत. तर 148 उमेदवार आहेत. सर्वाधीक 19 उमेदवार पश्‍चिम मतदार संघात तर सर्वात कमी 5 उमेदवार दिंडोरी मतदार संघात आहेत. एका "ईव्हीएम'वर 15 उमेदवार व नोटा अशा 16 उमेदवारांची सोय होत असल्याने पश्‍चिम मतदार संघात 2 ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहे. तर निवडणूकीत कर्तव्य बजावणाऱ्या 19 हजार पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 20 हजारावर टपाली मतदानाची सोय केली आहे. यावेळी पहिल्या मजल्यावरील 196 मतदार केंद्र तळमजल्यावर आणल्याने, 64 ठिकाणी तात्पुरत्या मतदान केंद्राची सोय आहे. ग्रामीण भागात 48 शहरात 60 याप्रमाणे 108 क्रिटीकल (संवेदनशील) केंद्र असून त्यात, निवडणूक लढविणाऱ्या 148 उमेदवारांचे मतदान असलेले 147 मतदान केंद्र क्रिटीकल म्हणून वाढल्याने जिल्ह्यात क्रिटीकल मतदान केंद्राची संख्या 256 झाली आहे. 

504 बस 2218 वाहन 
इव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यांच्या वाहतुकीसाठी बंदीस्त वाहन वापरली जाणार आहे. 29 ट्रक, 504 बस, 104 मिनीट्रक, टेम्पो, यासह 2218 वाहनाचा वापर होणार आहे. 1295 जीप आणि कार अधिग्रहीत करण्यात आल्या असून निवडणूक निरीक्षक, भरारी पथके तसेच अधिकाऱ्यांसाठी ही वाहने वापरात येणार आहे. नांदगाव 103, मालेगाव बाहय 133, मालेगाव मध्य 110, बागलाण 89, कळवण 188, चांदवड 108, येवला 115, सिन्नर 124, निफाड 118, दिंडोरी 163, नाशिक पूर्व 146, नाशिक मध्य 116, नाशिक पश्‍चिम 133, देवळाली 123, इगतपुरी 163 याप्रमाणे वाहनांची सोय करण्यात आली आहे. 

दुर्गम भागात 69 रनर 
जिल्ह्यातील 4 हजार 579 मतदान केंद्रापैकी 4513 केंद्र इंटरनेटने जोडली असून उर्वरीत 69 मतदान केंद्रांत नेटवर्कची समस्या असल्याने तेथे वायरलेस किंवा रनरची मदत घेतली जाणार आहे. त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, कळवणसह इंटरनेटची सुविधा नसलेल्या 69 रनर्स तैनात करणार आहेत. हे रनर पोलिस विभागाच्या वायरलेस संदेश यंत्रणेच्या सहाय्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील. एकुण मतदान केंद्रांपैकी 10 टक्के म्हणजेच 458 केंद्रावर वेबकास्टींग करण्याचा निर्णंय घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com