वॉक विथ कमिशनरमध्ये समाधानापेक्षा उपदेशाचे डोसं   

residenational photo
residenational photo

नाशिक: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर या तिसऱ्या उपक्रमात इंदिरा नगर वासियांना आज कामांच्या समाधानापेक्षा आयुक्तांकडून उपदेशाचे डोस अधिक मिळाले. नागरी कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी फक्त महापालिकेचीचं नाही तर त्यात नागरिकांचा देखील सहभाग असला पाहिजे. असा उपदेशाचा भला मोठा डोस देताना सध्या शहरातील महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी तीनशे ते चारशे कोटी रुपयांची गरज असून करवाढीतूनचं पैसा उभा राहणार आहे.

ज्यांचा करवाढीला आक्षेप आहे त्यांनी हरकती नोंदविण्याचे आवाहन करताना आयुक्तांनी पुन्हा करवाढीवर ठाम भुमिका मांडली. 

वॉक विथ कमिशनर उपक्रमाचा तिसरा टप्पा इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅकवर पार पडला. आयुक्त मुंढे यांच्याकडे सिटी गार्डनच्या दुर्देशा, साईनाथ नगर ते पांडव नगरी पर्यंतचे अतिक्रमण, अनाधिकृत नळजोडणी, रस्ते रुंदीकरण आदींच्या सत्तर तक्रार दाखल झाल्या त्यातील निम्म्या तक्रारी त्याच-त्याचं स्वरुपाच्या असल्याने त्यावर सुचना करण्यात आल्या. सुचना करताना आयुक्तांनी उपदेशाचे डोस दिले. गतिरोधक बसविल्याने अपघातांची समस्या सुटणार नाही. त्यासाठी चालकांवर संस्कार होण्याची गरज आहे. आम्ही जॉगिंग ट्रॅक साफ करून तुम्ही घाण करू नका. फेरीवाल्यांच्या तक्रारी करण्यापुर्वी त्यांच्याकडून खरेदी बंद केल्यास आपोआप आळा बसेल. द्वारका अंडरपासचा वापर होत नसेल तर अपघात होणारचं त्यासाठी वापर महत्वाचा असल्याचे या सारखे अनेक उपदेश दिले.

शहरात घरपट्टी व पाणीपट्टीची देयकेचं नागरिकांच्या हाती पडतं नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने पालिका तोंडघशी पडली आहे. नागरिक कर भरतं नाही असा आरोप प्रशासनाकडून कायम केला जातो. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिकेची चुक समोर आली. इंदिरा नगर परिसरात हॉकर्स झोन टाकण्यात आला असला तरी स्थानिक नगरसेवकांकडून दादागिरी होत असल्याची तक्रार करण्यात आली. रविवार कारंजावर फक्त दुचाकीलाचं प्रवेश मिळावा याबाबत मोबॅलिटी सेल मध्ये चर्चा करण्याच्या सुचना दिल्या. 

आयुक्तांच्या सुचना 
- शहरातील नाले बंदीस्त करणार नाही. 
- पुर्णत्वाचा दाखला मिळालेल्या ईमारतींचा अहवाल सादर करणार. 
- मालमत्ता करसवलत रद्दचं, बदल होणार नाही. 
- जॉगिंग ट्रॅकवर दररोज होणार स्वच्छता. 
- टवाळखोरांच्या उपद्रवामुळे सिटी गार्डन साठी वेळ निश्‍चिती. 
- सिटी गार्डनसाठी द्यावा लागणार कर, नागरिकांची समंती. 
- शहरात नवीन शॉपिंग सेंटर बांधणार नाही. 
- मोकळ्या भुखंडावर बांधकाम नाही, सद्यस्थितीतील बांधकामे जैसे-थे. 
- नागजी चौक सिग्नल चौफुलीवरचे अतिक्रमण तातडीने काढणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com