शहरी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून "वारी युपीएससीची' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नाशिक : उच्च पदस्थ अधिकारी आणि सामाजिक सेवा करण्याऱ्या व्यक्‍तींमार्फत वारी युपीएससीची हा अनोखा उपक्रम राबविला जातो आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात गुरूवार (ता.1) पासून मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेतर्फे शहरी तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. 

विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यात दरवर्षी होणाऱ्या पंढरपूरच्या वारीप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या होतकरू उमेदवारांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वारी युपीएससीची हा उपक्रम आयोजित केला आहे. कोणता अभ्यास करावा, कसा करावा याबद्दल मार्गदर्शन मिळणे कठीण आहे. यामुळे परीक्षार्थींचे चार पाच वर्षे व पैसेही खर्ची जातात. व हाती बऱ्याचदा निराशाच पडते. परीक्षांना सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news WARI UPSC