महावितरणाच्या धर्तीवर पाण्याची देयके देण्याचा विचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक : वीज वितरण प्रणालीत बदल करताना ग्राहकांकडून विज वापराचे पुरेपुर पैसे वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीने वीज वापराचे टप्पे निश्‍चित केले.  त्याच धर्तीवर शहरात पाण्याची देयके देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांसदर्भातील प्रस्ताव लवकरचं महासभेवर ठेवला जाणार आहे. जादा पाणी वापरावर जादा पैसे या तत्वानुसार आकारले जाणार आहे. 

वीज वितरण कंपनीकडून वीजेचे दर वसुल करताना ठराविक टप्पे निश्‍चित केले आहे त्यात एक ते शंभर युनिट वीज वापरासाठी वेगळा दर व त्यापुढे जसा विजेचा वापर वाढेल त्याप्रमाणे दर आकारणी केली जाते. याचाच अर्थ जादा वीज वापरावर जादा दर असे तत्व आहे. शहरात पाणी पुरवठा करताना ना नफा या तत्वावर सन 2018-19 या आर्थिक वर्षात साठ कोटी रुपये महसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दीष्ट गाठण्यासाठी महापालिकेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. त्यानुसार वितरण कंपनीच्या धर्तीवर योजना लागु होणार आहे.

सध्या शहराला दररोज 420 ते 430 दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो. त्यातील 44 टक्के पाण्याची गळती होत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. जेवढा पाणी पुरवठा होतो त्याच्या निम्म्या वापरावर देखील कर आकारणी होत नाही. पाण्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी करवाढ आवशक्‍य असली तरी महासभेचा विरोध आहे. प्रशासनाकडून वांरवार करवाढीचे प्रस्ताव दाखल केले जातात परंतू तेवढ्याचं वेगाने ते फेटाळले देखील जातात. महासभेकडून पाणी वितरण व देयके वसुल करण्याचे सल्ले दिले जातात. यंदा पाणी वाढीचा प्रस्ताव ठेवण्याबरोबरचं पाण्याचा अधिक वापर करणाऱ्यांवर अधिक आर्थिक बोजा टाकण्याचा भाग म्हणून पाणी वापर कराचे टप्पे ठरवून दिले जाणार आहे. 

पाण्याची स्थिती 
- शहराचा रोजचा पाणी पुरवठा- 420 ते 430 दशलक्ष लिटर. 
- नळजोडण्यांची संख्या- एक लाख 65 हजार. 
- वार्षिक सरासरी उत्पन्न- 30 ते 35 कोटी रुपये. 

Web Title: marathi news water