शहरात रविवारपासून एक वेळ पाणीकपात,गुरुवारी पूर्ण दिवस बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

नाशिक- गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असली तरी धरणात पुरेसा साठा होत नाही तोपर्यंत शहरात जेथे दोन वेळा पाणी पुरवठा होतो तेथे एक वेळ पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रविवार पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढील चार दिवस असमाधानकारक पाऊस झाल्यास गुरुवारी संपुर्ण एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. एकवेळ पाणी कपातीतून दररोज 60 दशलक्ष लिटर्स पाणी वाचविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. 
 
  शहरासाठी गंगापूर धरणातून 4200, दारणातून 400 तर मुकणेतून 300 असे एकुण 4900 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. दारणा धरणातून आतापर्यंत 252 दशलक्ष घनफुट पाणी उचलण्यात आले आहे. उर्वरित पाणी उचलतं असताना अळीयुक्त पाणी येत असल्याने मे महिन्यापासून येथून पाणी उचलणे बंद करण्यात आले त्याऐवजी नाशिकरोड विभागासाठी गंगापूर धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी गंगापूर धरणातीच पाणी पातळी खालावली. सध्या इन्टेक वेलच्या न्युनतम पातळी पर्यंत पाणी आले आहे. धरणातील मृतपाणी साठा उचलण्यासाठी चर खोदण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.

 पावसाने ओढ दिल्याने पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने यापुर्वीचं कपातीचा निर्णय घेतला होता. सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरी पुन्हा ओढ दिल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जुलै अखेर पर्यंत धरणात समाधानकारक पाणी साठा होत नाही तोपर्यंत कपात करणे आवशक्‍य असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त करतं महापौर रंजना भानसी यांच्यासमोर अहवाल सादर केला. आज महापौरांसह विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेत्या समोर अहवाल सादर करण्यात आल्यानंतर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

अशी होईल पाणी कपात 
- दररोज 460 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा. 
- 460 पैकी 60 दशलक्ष लिटर्स पाणी वाचविण्याचे उद्दीष्ट. 
- दोन वेळ पाणी पुरवठा तेथे एकवेळ होणार. 
- रविवार पासून तातडीने अंमलबजावणी. 
- असमाधानकारक पाऊस झाल्यास आठवड्यातून एक दिवस पुर्ण पाणी बंद. 
- एक दिवसाच्या ड्राय डे साठी गुरुवार निश्‍चित. 
- जलतरण तलाव, उद्यानांमध्ये पाणी पुरवठा बंद करण्याच्या सुचना. 
- बांधकामांच्या साईटवरचा पाणी पुरवठा बंद. 
- एकुण 10 ते 12 टक्के पाणी कपात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water cutting