LOKSABHA 2019-पाण्यासाठी वाहेगावसाळवासियांचा संघर्ष नित्याचाच...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात तीन-चार महिन्यांपासून दुष्काळीस्थिती आहे. वाहेगावसाळ(ता.चांदवड)   पाण्याच्या राजकारणाचे बळी ठरलेलं गाव. या गावात यंदा माणसांनाच नव्हे, तर जनावरांनाही विकतचे पाणी प्यावे लागत आहे. कुणीतरी सत्ताधारी येईल अन्‌ गावाच्या वेशीवर कालव्यात अडकवलेले पाणी देईल.यासाठी ग्रामस्थ डोळे लावून बसले आहे. पण इथे उमेदवार येतात मताचा जोगवा मागतात,गावकऱ्यांना मात्र पाण्याची आस आहे.... 
 
आशियातील मोठी कृषी बाजारपेठ लासलगाव सात किलोमीटरवर, तर निफाड, चांदवड व मनमाड येथून तिन्ही दिशांना 18 किलोमीटरवर आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषदेत जे सत्तेत आहेत ते विकासाचा डांगोरा पिटतात. मात्र, या गावाचे पाणी सरकार अन्‌ प्रशासन वेशीवरच अडवून ठेवते, - रतन गांगुर्डे, नवनाथ बोरगडे, माजी सरपंच अरुण न्याहारकर 
 
पाण्याचे रोटेशन आम्हाला नियम व नियोजनानुसार मिळाले पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थ पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, प्रशासनाने आमची कोंडी केली आहे. अजून तीन महिने दुष्काळात कसे काढायचे याचीच चिंता वाटते. 
- शोभा न्याहारकर, सरपंच 

पाणीटंचाईने आम्ही त्रस्त आहोत. नुकतीच गावात बैठक झाली. जर सरकार आम्हाला पिण्याचे पाणी देऊ शकत नसेल तर मतदान तरी का करावे, असा प्रश्‍न लोक उपस्थित करतात. त्यावर आमच्याकडे उत्तर नाही. प्रशासनाचे हा प्रश्‍न लवकर सोडवावा. 
- तुकाराम खैरे, उपसरपंच 

साठ किलोमीटरवर पाणी आले. शेवटच्या तीन किलोमीटरवर मात्र अडवले. प्रशासन व अधिकारी गावाचा सहानुभूतीने विचार करीत नाहीत, हीच खरी गावाची व्यथा आहे. 
- निवृत्ती न्याहारकर, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: marathi news WATER PROBLEM