थेंब थेंब पाण्यासाठी गणेशवाडीतील महिलांचा टाहो 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पंचवटी ः गंगापूर धरणात समाधानकारक जलसाठा होऊनही जुन्या नाशिकसह पंचवटीकरांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यात अशी परिस्थिती तर उन्हाळ्यात काय होणार असा प्रश्‍न करत या महिलांनी पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या कार्यालयात ठिय्या देत योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. 

गत महिन्यात गंगापूरसह अन्य धरण समुहात केवळ आठ ते नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यावर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने एकवेळच्या पाणीपुरवठ्याबरोबरच गुरूवारी "ड्राय डे' जाहीर केला. तेव्हापासून पंचवटीतील उंच भागातील अनेक घरांमध्ये नळ असूनही थेंबभर पाणी आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पहाटे नळ आल्यापासून येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news WATER PROBLEM