नाशिकमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद 

residentional photo
residentional photo

नाशिकः दसरा, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठाविषयक कामे लवकर आटोपण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शनिवारी (ता. 21) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारच्या पाणी बंदमुळे रविवारी सकाळचा पुरवठा कमी दाबाने राहील, असे पालिकेने कळविले आहे. 

ऐन सणासुदीच्या काळात पाणी बंद केल्यास नागरिकांची ओरड होत असल्याने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. बाराबंगला शुद्धीकरण केंद्राला गंगापूर पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला सिद्धार्थनगर कॅनॉल येथील गळती, ंचवटी जलशुद्धीकरण केंद्राजवळील 900 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन बदलणे, कोणार्कनगर येथे रायझिंग मेन जोडणे, म्हसरूळ येथे व्हॉल्व्ह बदलणे, कालिका पंपिंग स्टेशन येथील व्हॉल्व्ह दुरुस्ती, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथील रॉ वॉटर व्हॉल्व्ह दुरुस्ती, नाशिक रोडच्या पवारवाडी येथील रायझिंग मेन दुरुस्ती, सिडकोतील मुख्य लाइनवर अंबड येथे क्रॉस कनेक्‍शन करणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे रायझिंग मेन लाइन दुरुस्ती करणे आदी प्रलंबित कामे केली जाणार आहेत. गंगापूर व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याने शनिवारी (ता. 21) शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. रविवारी (ता. 22) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com