अडीचशे टॅंकर घटले, सिंचनासाठी एकपाणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नाशिक ः जलयुक्त योजनेचे लाभ विविध पातळ्यांवर दिसू लागले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत यंदा उत्तर महाराष्ट्रात टॅंकरची सख्या 247 ने घटली आहे. दुसरीकडे तब्बल 2.32 लाख हेक्‍टर क्षेत्राची एकपाण्याची सिंचनाची सोय झाली आहे. 

नाशिक ः जलयुक्त योजनेचे लाभ विविध पातळ्यांवर दिसू लागले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत यंदा उत्तर महाराष्ट्रात टॅंकरची सख्या 247 ने घटली आहे. दुसरीकडे तब्बल 2.32 लाख हेक्‍टर क्षेत्राची एकपाण्याची सिंचनाची सोय झाली आहे. 

गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या मध्याला उत्तर महाराष्ट्रात तब्बल 325 टॅंकर सुरू होते. यंदा हीच संख्या अवघी 78 आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामामुळे विभागात एक लाख 41 हजार 833 टीसीएम इतका पाणीसाठा तयार करण्यात यंत्रणेला यश आले आहे. उत्तर महाराष्ट्रात या कामांवर 498 कोटी रुपये खर्च झाले असून, प्रतिटीसीएम 35 हजार इतक्‍या अल्प दरात सिंचन साधण्यास जलयुक्त शिवारामुळे यश आले आहे. यंदाच्या 2017-18 आर्थिक वर्षासाठी 847 गावांची निवड झाली असून, त्यातील एक गावाचा अपवाद वगळता सर्वच्या सर्व गावांच्या आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. 

उत्तर महाराष्ट्रात... 
21 हजार 367 कामांचा 489 कोटींचा आराखडा 
390 कोटींच्या 18 हजार 638 कामांना मान्यता 
प्रशासकीय मान्यतेत राज्यात प्रथम क्रमांकावर 
176 कामे पूर्ण, 979 सुरू, तीन हजार 595चा कार्यारंभ 
619 कोटींच्या आराखड्यात 130 कोटी बचत 

इन्फोबॉक्‍स 
आर्थिक वर्ष 2016-17 
जिल्हा एकुण गाव 100 टक्के पूर्ण 80 टक्के पूर्ण 80 टक्केपेक्षा कमी कामांची संख्या जियो टॅगिंग पूर्ण 
नाशिक 218 217 01 00 6069 5564 
जळगाव 222 172 50 00 4856 3381 
नगर 268 96 172 00 9959 7978 
नंदुरबार 69 67 02 00 2631 2446 
धुळे 123 61 23 39 2290 1767 
एकूण 900 613 248 39 25805 21136 

आर्थिक वर्ष 2017- 2018 (कामांची स्थिती) 

जिल्हा प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता वर्क ऑर्डर दिलेली सुरू कामे 
नाशिक 3546 3681 1502 216 
धुळे 1201 1210 111 52 
नंदुरबार 1432 1432 296 180 
जळगाव 3308 3681 323 228 
नगर 8634 8634 1363 303 
एकूण 18121 18638 3595 979 

पावसाळी तालुक्‍यातील निकषांबाबत सुधारणाची दखल घेत शासनाने 3 तारखेला सुधारित आदेश काढून जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार दिले आहेत. मात्र यात "वॉटर न्यूट्रॅलिटी' हा निकष मात्र कायम राहाणार आहे. विभागात टॅंकर संख्या घटण्यासोबतच सिंचनाची सोय झाली. राज्यातील जियो टॅगिंगसह अनेक बाबतीत उत्तर महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे. 
- महेश झगडे, विभागीय आयुक्त 
 

Web Title: marathi news water tanker