पाचशे रुपये रोज देऊनही  शहरात मिळेना मजूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नाशिक ः पोटाची खळगी भरण्यासाठी शहरातल्या मजूर बाजारांत एरवी पहाटेपासून गर्दी करणारे मजूर आता दिसेनासे झाले आहेत. सकाळी दहा वाजले तरी मजूर मिळत नसल्याने हैराण झालेले ठेकेदार पाचशे रुपये मोजण्यास तयार होऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र शहरातील मजूर बाजारांत दिसून येते. 

नाशिक ः पोटाची खळगी भरण्यासाठी शहरातल्या मजूर बाजारांत एरवी पहाटेपासून गर्दी करणारे मजूर आता दिसेनासे झाले आहेत. सकाळी दहा वाजले तरी मजूर मिळत नसल्याने हैराण झालेले ठेकेदार पाचशे रुपये मोजण्यास तयार होऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र शहरातील मजूर बाजारांत दिसून येते. 
शहरात भद्रकालीतील दूध बाजार, गंगापूर नाका, पेठ नाका, बिटको चौक, आगरटाकळी, वडाळागाव, पाथर्डी फाटा चौक, आडगाव नाका, जेल रोड टाकी व सैलानीबाबा चौक येथे मजुरांचे बाजार भरतात. पंधरा दिवसांपासून या बाजारांत मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे काही दिवसांत बांधकाम व्यवसायावर आलेल्या संकटामुळे डबघाईला आलेला व्यवसाय. ज्या मजुरांना काम शिल्लक होते, तेदेखील लग्नकार्यानिमित्त गावाकडे गेले आहेत. त्यामुळे बांधकामांच्या साइटवर मजुरांची संख्या रोडावली आहे. नियमित कामगार गावाकडे गेल्याने ठेकेदार कामे पूर्ण करून घेण्यासाठी बाजारांमधील मजुरांकडे वळले आहेत; परंतु तेथेही सारखीच परिस्थिती आहे. मजुरांची टंचाई असल्याने उपलब्ध मजुरांचा रोजचा दर वाढला आहे. 

मजूर कमतरतेची प्रमुख कारणे 
- सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर अनुज्ञेय नसल्याने त्याचा परिणाम बांधकामावर झाला असून, त्यामुळे मजुरांना काम नसल्याने इतर शहरांत स्थलांतर झाले आहे. 
- बांधकामातील कपाटांचा वाद, मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाने बांधकामांवर बंदी आणल्याने बांधकामे बंद पडली. परिणामी मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने बांधकाम व्यवसायाची विस्कटलेली घडी बसण्यास अडचण येत आहे. 
- सध्या लग्नसराई असल्याने गावाकडे गेलेले मजूर परतण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्याशिवाय वाढत्या उष्म्यामुळे क्रयशक्ती कमी होत असल्याने मजूरटंचाई आहे. 

 

Web Title: marathi news worker in contraction