खंडणीप्रकरणी यावलच्या नगरसेवकास अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

यावल - येथील भाजपचे नगरसेवक अतुल पाटील यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणारी क्‍लीप प्रसारित करण्याची धमकी देत पन्नास हजारांची खंडणी मागणाऱ्या यावलचा नगरसेवक सुधाकर आनंदा धनगर यास यावल पोलिसांनी औरंगाबाद येथे त्याच्या निवासस्थानी आज पहाटे अटक केली. या प्रकरणी नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी काल रात्री तक्रार केली होती.

सुधाकर धनगर याने अतुल पाटील यांना गेल्या आठ मार्चला सायंकाळी खंडणीची मागणी केली. पाटील हे खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. आपल्याला अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाटील यांनी तक्रार केल्याचा संशय धनगर यांना आहे, याच कारणावरून त्यांनी पाटील यांची व माजी मंत्री खडसे आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. पाटील यांनी त्यापैकी दहा हजार रुपये दिले व उर्वरित 40 हजार रुपये नंतर देतो, मात्र तू आमच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करू नको, असे सांगितले. तथापि तुम्ही जर मला येत्या आठ दिवसांत उर्वरित पैसे दिले नाहीत, तर तुमचे हातपाय तोडून अश्‍लील क्‍लीप प्रसारित करेन, अशी धमकी दिल्याची तक्रार अखेर नगरसेवक अतुल पाटील यांनी केल्यानंतर यावल पोलिसांनी औरंगाबाद येथे जाऊन धनगर यास पहाटे अटक केली व दुपारी यावल येथे आणले.

Web Title: marathi news yaval news corporator arrested tribute

टॅग्स