तिड्या वनक्षेत्रात युवकाच्या प्रतिहल्ल्यात बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

यावल : तिड्या (ता. रावेर) येथील 24 वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केला. त्यात युवक आणि बिबट्या यांच्यात सुमारे अर्धा तास झटापट झाली. अखेर युवकाने बिबट्याला ठार केले. झटापटीत मात्र युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास येथील पूर्व वन विभागाच्या तिड्या (ता. रावेर) येथील वनक्षेत्रात घडली. समीर युसूफ तडवी असे जखमी युवकाचे नाव आहे. 

येथील पूर्व वनक्षेत्रात वसलेल्या आदिवासी तिड्या येथील समीर तडवी हा यावल तालुक्‍याच्या हद्दीत असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक 44 मध्ये त्याच्या शेतात काम करीत होता. तो शेताजवळील नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेला असता समोरून येत असलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. युसूफने हिमतीने त्याच्याशी टक्कर देत सुमारे अर्धा तास झुंज दिली. तडवीने बिबट्याचा प्रतिकार करताना दगडाने मारा केला. अखेर बिबट्याला ठार केल्यानंतर युसूफने सुटकेच्या निःश्वास घेतला. झटापटीत युसूफ तडवी गंभीर जखमी झाला असून, त्याला न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर सायंकाळी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच वनपरिक्षेत्रपाल व्ही. एम. पाटील यांनी सहकाऱ्यांसमावेत तिड्या गाठले. यावल वन विभागाचे जळगाव येथील संजय दहिवले, वन्यजीव संस्थेचे विवेक सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बिबट्या हा 17 वर्षांचा वृद्ध होता. दरम्यान, वन विभागाने मृत बिबट्याची शवचिकित्सा पशुवैद्यकीय अधिकारी एम. बी. इंगळे व डॉ. सोनवणे यांनी केली. त्याच्यावर जंगलातच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्रपाल व्ही. एम. पाटील यांनी दिली.

Web Title: marathi news yawal tidya van bibtya daith