Vidhan sabha : सर्वसामान्य जनता युती सरकारला कंटाळली : मोतीलाल नरवाडे  

live photo
live photo

भडगाव : सर्वसामन्य जनता व शेतकरी युती शासनाच्या चुकीच्या धोरणाला कंटाळले आहेत. त्यामुळे दिलीप वाघ यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन मतदार यावेळी महाआघाडीसोबत राहतील, असा विश्वास पेठ भागातील ज्येष्ठ नेते मोतीलाल नरवाडे यांनी व्यक्त केला. 
 
राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ पेठ भागात प्रचार रॅली काढण्यात आली. पाचोरा पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संजय वाघ, माजी नगरसेवक डाॅ. विजयकुमार देशमुख, माजी नगरध्यक्ष तथा शहराध्यक्ष शामकांत भोसले, शशिकांत चंदिले यांच्या नेतृत्वाखाली पेठ भागात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला पेठ भागत प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी आमदार दिलीप वाघ यांचा ग्रामीण भागात व शहरातील जनतेशी असलेली बाधिलकीचा अनुभव रॅली दरम्यान जाणवत होता. यावेळी ज्येष्ठ नेते मोतीलाल नरवाडे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले, की सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणामुळे कंटाळली आहे. शेतकऱ्यांना अजूनही पूर्ण कर्जमाफी झालेली नाही. पाच वर्षे झाले तरी हे सरकार शेतकऱ्यांविषयी अजून अभ्यासच करत आहे का? असा सवाल उपस्थित करत हे फसवे शासन हद्दपार करण्यासाठी आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्यामागे उभे राहण्याचे आवाहन केले. तर शहराच्या विकासासाठी दिलीप वाघांची आवश्यकता असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात विकासाचा खर्या अर्थाने पाया रचला गेला. त्यामुळे जनता हे जाणून राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या पाठीमागे उभे आहेत. रॅलीला असलेली गर्दी हे त्याचे द्योतक असल्याचे मोतीलाल नरवाडे यांनी सांगितले. गटनेते संजय वाघ यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला घेतले. 
यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुक्याध्यक्ष व्ही. एस. पाटील, अरुण पाटील, डी. डी. पाटील, आर जे.बाग, बापू काळे, गणेश नरवाडे, योगेश महाजन, शंकर पाटील, नगरसेवक सुभाष दगा पाटील, सुभाष बोरसे, विशाल पाटील, मोहसिन शेख, अनिल टेकडे, अरुण गंजे, डाॅ. जे. डी. शेख यांच्यासह कार्यकर्ते प्रचार रॅलीत उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com