आशा गटप्रवर्तकांचे मूक धरणे 

live
live

नाशिकः राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (ता. 14) आरोग्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आशा गटप्रवर्तकांनी मूक धरणे धरले. 

राज्यात 90 हजारांहून अधिक आशा आणि गटप्रवर्तक महिला आहेत. 3 सप्टेंबरपासून त्यांचे मानधन वाढीच्या मागणीसाठी राज्यात कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्यभर मोर्चे, आंदोलन, जेलभरो आंदोलनानंतर आमदार व खासदारांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करीत व लोकप्रतिनिधींनी निवेदन देत लक्षवेध आंदोलन झाले. एकाच वेळी सगळीकडे सुरू असलेल्या या आंदोलनाची अजूनही शासनाने दखल घेतलेली नाही. आशा व गटप्रवर्तकांना तीनपट मानधन वाढवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी मूक निदर्शने करण्यात आली. नाशिकला भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करण्यात आली. विजय दराडे, जिल्हाध्यक्षा अर्चना गडाख, सायली महाले, ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, शीतल रहाडे, माधुरी रिकामे आदींच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तकांनी धरणे धरले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com