esakal | नंदूरबारमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन; अर्णव गोस्वामीला अटक करण्याची केली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

नंदूरबारमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन; अर्णव गोस्वामीला अटक करण्याची केली मागणी

लष्करा संबंधीची माहिती बाहेर येणे हे देशासाठी गंभीर बाब आहे. यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे.

नंदूरबारमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन; अर्णव गोस्वामीला अटक करण्याची केली मागणी

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्णव गोस्वामीला अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कायार्लयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. 

आवश्य वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय;  छापा पडला आणि सत्य समोर आले !  
 

देशाच्या सुरक्षितेसाठी अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे आली कशी? देशाच्या संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे अत्यंत गंभीर बाब असून लष्करा संबंधीची माहिती बाहेर येणे हे देशासाठी गंभीर बाब आहे. यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे. अश्या देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्णव गोस्वामी त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसने नंदूरबार मध्ये आंदोलन करून केली.

वाचा- नैराश्य, संतापात कोणाला न सांगता घरून निघाला; आणि पूलावरुन थेट नदीत उडी मारून संपवले जीवन    
 

जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात माजी मंत्री पद्माकर वळवी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक सेवादल अध्यक्ष नरेश पवार,शांतिलाल पाटिल ,इकबाल खाटीक,पंडितराव पवार ,स्वरूप बोरसे ,देवाबापु चौधरी आदी उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे