हंडा मोर्चा, महिलांचा पाण्याच्या टाकी समोर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

येवला - पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आल्याने अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. गावात टंचाई असल्याने नियोजनानुसार ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी द्या किंवा तत्काळ टँकर सुरु करा या मागणीसाठी गोरखनगर येथील महिलांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रुद्र रूप धारण केले. हंडा मोर्चा काढून येथील ३८ गाव पाणी पुरवठावितरणच्या पाण्याच्या टाकी समोर ठिय्या धरला. आश्वासन मिळाल्यावर या महिला शांत झाल्या.

अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या ८०० लोकसंख्येचे हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी असून, अल्प पावसामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथे जवळच ३८ गावं पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. मात्र अजून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे महिलांनी रास्तारोको व उपोषण करण्यात येणार असे निवेदनही प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या महिला आक्रमक झाल्या. यावेळी अनकाईचे माजी सरपंच डॉ. सुधिर जाधव, शिवसेनेचे वाल्मिक गोरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलन स्थगित केले. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला तुमचे गाव जोडून घ्या असे पत्र तीन वर्षापुर्वीच ग्रामपंचायतीला दिले असल्याची माहिती यावेळी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष मोहन शेलार यांनी याठिकाणी दिली.

पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांनी याठिकाणी भेट देत कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामस्थ व महिलांनी यादव, जाधव, शेलार यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार, आदीसह अनेक नागरिकांच्या यावर सह्या आहेत.

''३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काम करून घेण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत ग्रामसेवकाने प्रयत्न करावे. तोपर्यंत ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून खर्च केला तर हा प्रश्न लागलीच मार्गी लागेल. आपण त्यात मोलाचा वाटा देऊ''.

डॉ.सुधिर जाधव,माजी सरपंच,अनकाई

Web Title: marathi newsnorth maharashtra handa morcha yeola